मंगळवार, जानेवारी 31, 2023

Pimpri News : इंदिरा गांधी उड्डाणपुलाच्या दुरुस्तीच्या कामाला विलंब होत असल्यामुळे नागरिक त्रस्त

एमपीसी न्यूज : पिंपरी येथील इंदिरा गांधी पुलाचे दुरुस्तीकरण चालू असून, सदर काम हे अतिशय संत गतीने चालू आहे. त्यामुळे तेथील असलेल्या मूळ रहिवासी, व्यापारी वर्ग व ग्राहक यांना नाहक त्रास होत आहे व अन्य अडचणी देखील निर्माण होत आहे. आयुक्त साहेबांनी स्वतः लक्ष घालून सदर कामाला उशीर होण्या मागे प्रशासन जबाबदार आहे का, संबंधित ठेकेदार याची चौकशी करून त्यांच्यावरती कडक कारवाई करून, सदर काम लवकरात लवकर पूर्ण करण्याबाबत आदेश द्यावे, असे निवेदन देण्यात आले.

या पुलाचे दुरुस्तीकरण करण्याचे काम हे ‘मे.हरक्यूलस स्ट्रक्चरल सिस्टम्स प्रा.लि.’ यांना 28 फेब्रुवारी 2020 रोजी दिले असून, त्यांनी या कामाची प्रत्यक्षात सुरवात 1 ऑक्टोबर 2020 रोजी झाली. या कामाची करारनाम्यानुसार 15 महिने इतकी मुदत होती. परंतु सदर ठेकेदाराला दोन वेळा मुदत वाढ देण्यात आली.

प्रथम मुदतवाढ- 15 महिने (28 ऑगस्ट 2022). व दितीय मुदतवाढ- 7 महिने (31/05/2023) अश्या प्रमाणे सदर ठेकेदाराला मुदतवाढ देण्यात आली.

Pune News : कामाचे उर्वरीत पैसे मागितले म्हणुन बूटीक चालक महिलेस मारहाण, शिवीगाळ व ठार मारण्याची धमकी

परंतु, सदर उड्डाणपुलाचे काम दिलेल्या वेळेत पूर्ण होणे अपेक्षित असताना देखील, सदर कामाला 2.5 वर्षे गेले. व मनपा अधिकारी सदर कामा बाबत सांगतात की सदर पुलाचे काम हे 53 टक्के झाले आहे. म्हणजे सदर काम हे 53 टक्के झाले असून त्याला 2.5 वर्ष कालावधी लागला आहे, राहिलेल्या कामाला अजून 2 ते 2.5 वर्षे लागणार आहे का? असा प्रश्न व्यापारी वर्ग, नागरिक व ग्राहक यांच्या पुढे उभा राहतो. बाकीच्या ठिकाणी कोणत्याही कामाला उशीर झाला तर गोर-गरीब ठेकेदारांवर्ती दंडात्मक कारवाई किवां त्यांना काळ्या यादी (BLACK LIST) मध्ये टाकले झाते.

परंतु, सदर ठेकेदारावरती आजतागायत कोणत्याही प्रकरची दंडात्मक कारवाई करण्यात आली नाही. कारवाई न करता उलट त्याला कामाची मुदतवाढ देण्यात येते, म्हणजे यामागे अधिकारी यांची काही मिलीबगत आहे का? असा देखील प्रश्न उभा राहतो. तसेच याकामाची कोणत्याही प्रकरचे ‘अपडेट’ मा.आयुक्त साहेब तसेच सिटी इंजिनिअर यांच्या पर्यंत पोचत नाही का असा देखील प्रश्न उभा राहतो.

सदर काम लवकरात लवकर पूर्ण करण्याबाबत आदेश द्यावे, अन्यथा स्थानिक नागरिक, व्यापारी वर्ग मिळून शगुन चौक, पिंपरी येथे याबाबत मोर्चा काढण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

Latest news
Related news