Charholi : चऱ्होली येथे कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन व महिला वस्तीगृहाचे भूमिपूजन

एमपीसी न्यूज – स्व- रुपवर्धिनी या संस्थेने चऱ्होली बुद्रुक येथे कौशल्य विकास अभ्यासक्रमासाठी तीन मजली प्रशिक्षण केंद्राची इमारत उभी केली या वास्तूचे उद्घाटन (Charholi) व त्याच्या जवळच उभारल्या जाणाऱ्या महिला वसतीगृहाचे येत्या रविवारी (दि.23) भूमीपुजन होणार आहे. हा कार्यक्रम चऱ्होलीतील पठारे मळा धानोरी लिंक रोड येथे सकाळी नऊ वाजता सुरु होणार आहे.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कन्याकुमारी येथील विवेकानंद केंद्राच्या उपाध्यक्ष निवेदिता भिडे असणार असून स्व-रूपवर्धिनी संस्थेचे अध्यक्ष डॉ. रघुनाथ माशेलकर, उपाध्यक्ष उदय गुजर, शिरीष पटवर्धन, विवेक सावंत, कार्याध्यक्ष डॉ. संजय तांबट, कार्यवाहक विश्वास कुलकर्णी आदी उपस्थित राहणार आहेत.

MPC News Podcast 20 April 2023 – ऐका…आजचे एमपीसी न्यूज पॅाडकास्ट

संस्थेची पार्श्वभूमी आणि आजवरचे कार्याबद्दल सांगायचे झाले तर, कै.किशाभाऊ पटवर्धन सरांनी 1979 साली पुण्यामध्ये कै.राजाभाऊ लवळेकर, कै.पुरुषोत्तमभाई श्रॉफ अशा शिक्षण क्षेत्रातील काही सहका-यांच्या मदतीने संस्था स्थापन केली. आर्थिक / सामाजिक दृष्ट्या कमकुवत समाज घटकातील चुणचुणीत मुलामुलींचा सर्वांगीण विकास व त्यातून नेतृत्व विकास करण्याच्या हेतूने या कामाची सुरुवात झाली. गेल्या 43 वर्षांमध्ये या प्रकल्पाचा लाभ हजारो मुला मुलींना झाला असून आज हे विद्यार्थी आपापल्या व्यक्तिगत जीवनात यशस्वी वाटचाल करीत आहेत.यातील अनेकजण व्यक्तिगत जीवन जगात असताना संस्थेच्या संस्कारांचे स्मरण ठेऊन समाजाची सेवा आपापल्या पद्धतीने करीत आहेत. कोरोना काळामध्ये संस्थेच्या युवक युवती कार्यकर्त्यांनी केलेल्या सेवेची दखल घेतली गेली.

 

कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र- चऱ्होली बुद्रुक

नोव्हेंबर 2019 मध्ये कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्राच्या बांधकामाच्या पहिल्या टप्याचे प्रत्यक्ष काम सुरु झाले. मार्च 2020 मध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले. (Charholi) या प्रतिकूल वातावरणावर मात करीत, समाजातील दानशूर व्यक्ती, न्यास, उद्योगसंस्था यांनी दिलेल्या आर्थिक मदतीच्या आधारावर या केंद्राच्या बांधकामाचा पहिला टप्पा पूर्ण झाला. या इमारतीमध्ये आरोग्य विषयातील शासन मान्य तसेच अन्य विषयातील खालील  अभ्यासक्रम जून,2023 पासून सुरु करण्याचा संस्थेचा मानस आहे.

 

अनु.क्र. अभ्यासक्रमाचे नाव
01 Certificate Course in Operation Theatre Technician
02 Certificate Course in Medical Record & Health Information
03 Certificate Course in GN&M Assistant
04 Diploma Course in Physiotherapist

अन्य अभ्यासक्रम

01 Diploma in Fashion Designing (कर्वे स्त्री शिक्षण संस्था मान्यताप्राप्त)
02 रुग्ण सहाय्यक अभ्यासक्रम

(टि.म.विद्यापीठ मान्यताप्राप्त)

03 कथक नृत्य प्रशिक्षण
04 Basic Robotics Designing
05 PCB Fabrication, ROS, Rapid Prototyping, Python Hardware

 

वरील अभ्यासक्रमां व्यतिरिक्त काही अन्य नवे उपक्रम सुरु होणार आहेत ज्यामध्ये Four Wheeler Driving Training on Simulator, Planetarium, अग्निवीर प्रशिक्षण केंद्र अशा (Charholi) उपक्रमांचा समावेश असेल. क्रीडा विषयासाठी सुद्धा स्वतंत्र नियोजन करण्याची संस्थेची योजना आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.