Rahul Gandhi : राहुल गांधी यांना मोठा झटका; सुरत सत्र न्यायालयाने याचिका फेटाळली

एमपीसी न्यूज : काँग्रेसने नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना सेशन कोर्टाने मोठा झटका दिला आहे. अब्रूनुकसान संदर्भातील याचिका कोर्टाने फेटाळली आहे.

23 मार्च रोजी, सुरतच्या CJM न्यायालयाने राहुल गांधी यांनी 2019 मध्ये मोदी आडनावाबाबत केलेल्या टिप्पणीप्रकरणी कलम 504 अंतर्गत दोन वर्षांची शिक्षा सुनावली. मात्र, न्यायालयाने या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी 30 दिवसांची मुदतही दिली होती.

Charholi : चऱ्होली येथे कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन व महिला वस्तीगृहाचे भूमिपूजन

राहुल गांधी यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान कर्नाटकातील कोलारमध्ये एका रॅलीत ललित मोदी, निरव मोदी, नरेंद्र मोदी यांची नाव कॉमन का आहेत? सगळ्या चोराचे नाव मोदी का असतं? असं विधान केलं होतं.

त्यावरुन मोठा वाद निर्माण झाला होता. (Rahul gandhi) त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. संपूर्ण मोदी समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप त्यांच्यावर होता. या प्रकरणात न्यायालयाने त्याला दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.