Chinchwad : राजमाता जिजाऊ सांस्कृतिक भवनात सुविधांचा अभाव

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडकरांची सांस्कृतिक भूक भागविण्याबरोबरच विविध कार्यक्रमासाठी मोहननगर येथे उभारण्यात आलेल्या राजमाता जिजाऊ सांस्कृतिक भवनात सुविधांचा अभाव असताना मात्र, आवाच्या-सव्वा दराने भाडे आकारण्यात येत असल्याने याठिकाणी कार्यक्रम होण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. वर्षभरात बोटावर मोजण्या इतके कार्यक्रम या भवनमध्ये होत आहेत.(Pimpri) या सांस्कृतिक भवनकडे महापालिकेचे आणि क्षेत्रीय कार्यालयाचे दुर्लक्ष झाल्याने भवन परिसराची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे या भवनाची त्वरीत दुरूस्ती करून दर्जेदार सुविधा उपलब्ध करून द्यावेत. तसेच सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेल, असे दर करावेत, अशी मागणी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस प्रदेश सरचिटणीस विशाल काळभोर यांनी केली आहे.

याबाबत काळभोर यांनी प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या वाढत आहे. त्यामुळे नागरिकांची सांस्कृतिक भूक भागविण्याबरोबरच विविध कार्यक्रम घेण्यासाठी महापालिकेने शहराच्या विविध सांस्कृतिक भवन, नाट्यगृहे, प्रेश्रागृहे उभारली आहेत. याच धर्तीवर चिंचवड मोहननगर परिसरात राजमाता जिजाऊ सांस्कृतिक भवन उभारण्यात आले आहे. या भवनाच्या शेजारीच एक प्रशस्त हॉल उभारण्यात आला आहे. या भवनमध्ये परिसरातील शाळांचे तसेच नागरिकांची विविध छोटे-मोठे सांस्कृतिक कार्यक्रम होतील, त्यातून पालिकेला उत्पन्न मिळेल, असा हेतू पालिकेचा आहे.

 

मात्र, या ठिकाणी स्वच्छतेचा अभाव, माइक साउंड सिस्टम, फॅन, वातानुकूलित यंत्रणा, प्रोजेक्‍टर, टेबल खुर्ची अशा विविध सुविधांचा अभाव असल्याने सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यासाठी अडचण येत आहे. सुविधांचा प्रचंड अभाव असताना या भवनाचे आणि हॉलचे भाडे आवाच्या-सव्वा म्हणजे तब्बल 30 ते 35  हजार रूपयांच्या घरात आहे. यामुळे याठिकाणी कार्यक्रम होण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. (Pimpri) वर्षभरात बोटावर मोजण्या इतके कार्यक्रम या भवनमध्ये होत आहेत. त्यामुळे महापालिकेच्या हेतूलाच हरताळ फासल्याचे दिसून येत आहे. तसेच या सांस्कृतिक भवनकडे महापालिकेचे आणि क्षेत्रीय कार्यालयाचे दुर्लक्ष झाल्याने भवन परिसराची दुरावस्था झाली आहे.

Rahul Gandhi : राहुल गांधी यांना मोठा झटका; सुरत सत्र न्यायालयाने याचिका फेटाळली

याबाबत काळभोर म्हणाले, राजमाता जिजाऊ सांस्कृतिक भवन आणि हॉलमध्ये सुविधांचा अभाव आहे. दुसरीकडे चिंचवड येथील कै. रामकृष्ण मोरे नाट्यगृह, संत तुकारामनगर येथील आचार्य अत्रे सभागृह, भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे प्रेक्षागृहात सर्व सुविधा आहेत. सर्व सुविधा असतानाही या ठिकाणी दर अल्प आहेत. मात्र, जिजाऊ सांस्कृतिक भवनमध्ये अव्वाच्या सव्वा भाडे असून उच्च दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. तसेच भाडे कमी करावे. या भवनच्या परिसरात झालेली दुरावस्था व्यवस्थित करावी, यासाठी आपण पालिकेच्या जनसंवाद सभेमध्ये वारंवार मागणी केली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांना सर्व वस्तूस्थिती सांगितली आहे. या भवनाची त्वरीत दुरूस्ती करून सर्वसामान्यांना परवडेल, असे दर करावेत, अशी मागणी काळभोर यांनी केली आहे.

राजमाता जिजाऊ सांस्कृतिक भवन आणि हॉलचे भाडे जास्त असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. याबाबत नगररचना विभागाकडून नव्याने रेट मागवून घेणार आहोत.(Pimpri) तसेच भवन परिसराची दुरूस्ती करण्यासाठी स्थापत्य विभागाला सूचना दिल्या असल्याची माहिती अ क्षेत्रिय अधिकाऱ्यांनी दिली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.