Mhalunge : बेशुद्ध करत अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग

एमपीसी न्यूज – अल्पवयीन मुलीला बेशुद्ध करत तिच्यावर अतिप्रसंग करणाऱ्या नराधमावर म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडितेने बुधवारी (दि.19) याप्रकरणी म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्याच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.हा धक्कादायक प्रकार कुरळी येथे मंगळवारी (दि.18) दुपारी घडला होता.

Chinchwad : राजमाता जिजाऊ सांस्कृतिक भवनात सुविधांचा अभाव

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा पीडितेच्या घरा शेजारीच राहतो. पीडिता दुकानात चॉकलेट अनण्यासाठी जात असताना आरोपीने तिचा हात पकडून खोलीमध्ये खचले. पीडिता आरडाओरड करत असताना आरोपीने बेशुद्धीचे औषध असलेला रुमाल तिच्या तोंडाला लावला व तिला बेशुद्ध केले.(Mhalunge) पीडितेला बेशुद्ध करत तिच्यावर आरोपीने अतिप्रसंग केला. यावरून आरोपीवर बाललैंगिक अत्याचार व बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस याचा पुढील तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.