Alandi : पावसाच्या जोरदार हजेरीमुळे इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत वाढ

एमपीसी न्यूज – गेल्या दोन दिवसांपासून मावळ भागात (Alandi) व धरण क्षेत्रात पावसाने जोरदार हजेरी लावली दिसून येत आहे. त्यामुळे इंद्रायणी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झालेली दिसून येत होती.

Mumbai : देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर अजित पवार यांनी घेतलं गणरायाचं दर्शन; भेटीबाबत पुण्याचे पालकमंत्री बदलण्याच्या चर्चांना उधान

नदीपात्रातील पाण्याची पातळी वाढल्याने आळंदीतील सिद्धबेट लगत असणाऱ्या जुन्या बंधाऱ्या वरून पाणी नदीपात्रात पडत असल्याचे दृश्य पाहण्यास भेटत होते. तसेच इंद्रायणी घाटातील भक्त पुंडलिक मंदिरात ही पाणी शिरले होते. पाण्याची पातळी वाढल्याने काहीश्या प्रमाणात नदी पात्रातील पाणी दोन्ही बाजूच्या दगडी घाटावर आले होते. तसेच आज दि.27 रोजी सायंकाळी पावणे पाच च्या सुमारास आळंदी शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.