Chinchwad : एल्प्रो स्क्वेअर सिटी मॉलमधील महिलांच्या सुरक्षेचा विचार करावा; प्रदीप नाईक यांचे अश्विनी जगताप यांना निवेदन

एमपीसी न्यूज – चिंचवड येथील एल्प्रो स्क्वेअर सिटी मॉल येथे (Chinchwad) कामाला असलेल्या महिला स्टाफबाबत केल्या जाणाऱ्या भेदभाव व तसेच महिलांच्या सुरक्षिततेच्या विषयावर गांभीर्याने विचार करावा अशा आशयाचे लेखी निवेदन माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे कार्यकारीणी सदस्य प्रदीप नाईक यांनी चिंचवडच्या आमदार अश्विनी जगताप यांच्याकडे दिले आहे.
या निवेदनात नाईक यांनी म्हटले आहे की, एल्प्रो स्क्वेअर सिटी मॉलच्या व्यवस्थापनाने महिलांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत कुठलेही ठोस पावले उचलताना दिसून येत नाही. तसेच महिला तेथे रात्री दहा वाजेपर्यंत काम करीत असतात. स्वच्छतागृह हे थेट पार्किंगमध्ये आहे. ते पार्किंगमध्ये असल्यामुळे तेथे प्रचंड रहदारी व वर्दळ असते.
पार्किंगमध्ये अनेक गाडया पार्क केलेल्या असतात. त्या गाडयांमध्ये कोण कोण आहे किंवा कोण लपलेले आहे का? याची कुठलीही कल्पना तेथील कामगारांना कशी असणार? पार्किंगमध्ये अनेक लोकांच्या तेथे गाड्या पार्क केलेल्या असतात व तेथे कुठलीही तपासणी होत नसते?
ती मॉलच्या मुख्य प्रवेशद्वारा जवळ होत असते. कुठलीही तपासणी होत नसल्यामुळे तेथे घातपात होण्याची शक्यता आहे. महिलांच्या सुरक्षिततेबाबत एल्प्रो स्क्वेअर सिटी मॉलमध्ये स्वच्छतागृहाजवळ पुरुष सुरक्षा रक्षक उभे असतात. तेथे महिला सुरक्षा रक्षक पाहिजे. महिला कर्मचाऱ्यांना मॉलमधील वरील स्वच्छतागृह देण्यात यावे. जेथे इतर महिलांकरीता स्वच्छतागृह आहे तेच त्यांना देण्यात यावे.
Pimpri : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे स्मारक उभारा; राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मागणी
आज एकीकडे भारत सरकार किंवा महाराष्ट्र शासन महिलांच्या सुरक्षिततेसाठी ठोस पाऊले उचलत आहे. तसेच कायदे कठोर करत आहे आणि एकीकडे एल्प्रो रक्वेअर सिटी मॉल महिलांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करीत आहे. महिलांना स्वच्छतागृहासाठी पार्किंगमध्ये व्यवस्था केलेली आहे, पार्किंग मध्ये व्यवस्था करण्याचे कारण अद्याप समजलेले नाही?
पार्किंगमध्ये अनेक प्रकारची लोक बसलेले असतात. तेथे कुठेही त्यांची तपासणी होत नसते व अश्याच जर कुठल्या महिलेवर हल्ला किंवा लैंगिक अत्याचार झाल्यास कोण जिम्मेदार? किंवा अन्य कुठला महिलेच्या बाबतीत प्रकार घडल्यास किंवा तेथे गुप्तपणे कॅमेरे लावल्यास कोण जिम्मेदार असेल?
कारण पार्किंगमध्ये कुठल्याही प्रकारची सुरक्षिततेची (Chinchwad) किंवा अन्य कुठल्याही प्रकारची व्यवस्था नसल्यामुळे तेथे कुठलाही प्रकार घडू शकतो? आणि घडल्यास याला मॉल प्रशासन पुर्णपणे जिम्मेदार राहील व मॉल प्रशासनाने त्वरीत हा निर्णय मागे घेऊन फक्त महिला कर्मचाऱ्यांना सुरक्षिततेच्या कारणास्तव मॉलच्या आतमध्ये महिला कर्मचाऱ्यांची स्वच्छतागृहाची व्यवस्था करण्यात यावी. याबाबत मॉल व्यवस्थापनाला कळवून हा निर्णय मागे घेण्यात यावा, अशी विनंती जगताप यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
याबाबत एल्प्रो स्क्वेअर सिटी मॉल व्यवस्थापनाशी एमपीसी न्यूजने संपर्क साधला असता व्यवस्थापनाने अशी कोणतीही तक्रार कर्मचाऱ्यांची नाही. त्यांच्या ठरलेल्या वेळातच कर्मचारी काम करतात. स्वच्छतागृह देखील ग्राहकांसाठी असतात तेवढी स्वच्छ, अद्ययावत व सुरक्षित आहेत, असा निर्वाळा करण्यात आला.