Pimpri : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे स्मारक उभारा; राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड (Pimpri) शहराचे नाव उद्योगनगरी म्हणून देशाच्या नकाशावर पोहचले आहे. या शहराचे देशात आणि जगात एक वेगळे महत्त्व आहे. एकीकडे देश आजादी का अमृत महोत्सव साजरा करत असताना दुसरीकडे देशाला ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य मिळवून देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा शहरात एकही पुतळा नाही ही शहरासाठी दुर्दैवाची गोष्ट आहे. त्यामुळे महापालिकेने तातडीने महात्मा गांधी यांचे स्मारक उभारावे, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केली आहे.

याबाबत आयुक्त शेखर सिंह यांना निवेदन देण्यात आले आहे. युवक अध्यक्ष इम्रान शेख, शहर सचिव ऋषिकेश गारडे, जावेद शेख, नागेश्वर ससाने, रजनीकांत गायकवाड, विशाल शिरसागर संतोष कदम, महेश यादव उपस्थित होते. युवक शहराध्यक्ष इम्रान शेख म्हणाले, महात्मा गांधी यांनी देशाला स्वातंत्र्य तर मिळवून दिलेच पण त्याचबरोबर जगाला अहिंसेचा विचार दिला.

येत्या 2 ऑक्टोबर 2023 रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 154 वी जयंती साजरी करणार असून जगातील प्रत्येक देशात महात्मा गांधी यांचे स्मारक आहे. दिल्ली येथे झालेल्या G20 परिषदेसाठी उपस्थित असलेल्या सर्व विविध देशाच्या राष्ट्रप्रमुखांनी राजघाट येथील महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळी जाऊन नतमस्तक झाल्याचे आपण सर्वांनी पाहिले आहे.

Chinchwad : एल्प्रो स्क्वेअर सिटी मॉलमधील महिलांच्या सुरक्षेचा विचार करावा; प्रदीप नाईक यांचे अश्विनी जगताप यांना निवेदन

पिंपरी-चिंचवड सारख्या (Pimpri ) ऐतिहासिक शहरात महात्मा गांधी यांचा पुतळा नसणे ही मोठी खेदाची बाब आहे. महापालिकेने या गोष्टीचा गांभीर्यपूर्वक विचार करून पिंपरी-चिंचवड शहरात महात्मा गांधी यांचे भव्य स्मारक उभे करण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी. 2 ऑक्टोबर 2024 पूर्वी शहरात महात्मा गांधी यांचे स्मारक उभे केले जावे, अशी मागणी शेख यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.