Chinchwad : गणपती विसर्जनासाठी शहरात दोन हजार पोलिसांचा बंदोबस्त

एमपीसी न्यूज – गणपती विसर्जनासाठी (Chinchwad) पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त लावला आहे. विसर्जन मिरवणूक शांततेत आणि निर्विघ्न पार पाडण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी शहरात दोन हजार पेक्षा अधिक पोलिसांचा बंदोबस्त लावला आहे. त्याशिवाय विविध पथके कार्यान्वित केली असून संशयित बाबींवर निगराणी ठेवण्यासाठी सर्वेलंस व्हॅन देखील गर्दीच्या ठिकाणी लावल्या जाणार आहे.

पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत एक हजार 934 गणेशोत्सव मंडळांना परवानगी देण्यात आली आहे. त्यातील एक हजार 86 मंडळांचे गुरुवारी (दि. 28) विसर्जन होणार आहे. परवानगी न घेता गणेशोत्सव साजरा करणारी देखील काही मंडळे असतात. विसर्जन मिरवणुकीत शहरात मोठ्या प्रमाणात गर्दी होते.

त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची मोठी जबाबदारी पोलिसांवर येते. पिंपरी-चिंचवड शहरात गणेशोत्सवासाठी बाहेरून बंदोबस्त मागवण्यात आला आहे.

याच पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी शेकडो गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाया केल्या आहेत. गणेशोत्सव शांततेत पार पडण्यासाठी मंडळांना पोलिसांनी गर्दी, आवाज, सुरक्षा आदींबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच प्रत्येक मंडळाचे पाच प्रतिनिधी पोलिसांना सहकार्य करण्यासाठी नियुक्त केले आहेत. यासोबत ग्रामरक्षक दल, शांतता कमिटीची देखील मदत घेतली जात आहे.

Chinchwad : ‘गुरुकुलम’च्या विद्यार्थ्यांनी लुटला सांगीतिक मैफलीचा आनंद

शहरातील पोलीस बंदोबस्त – Chinchwad 

अपर पोलीस आयुक्त – 1
पोलीस उपायुक्त – 5
सहायक पोलीस आयुक्त – 8
पोलीस निरीक्षक – 59
सहायक निरीक्षक/उपनिरीक्षक – 177
अंमलदार – 1665
होमगार्ड – 239
एसआरपीएफ – 1 कंपनी (100 जवान)
आरसीपी – 4
स्ट्राईकिंग – 18

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.