Chinchwad :  स्नेह फ्लोरिस्टचे संचालक पंढरीनाथ म्हस्के यांना ‘इंडियन फ्लोरल डिझाईन चॅम्पियनशिप अवॉर्ड’  

एमपीसी न्यूज – इंडियन फ्लोरल डिझाईन चॅम्पियनशिप स्पर्धेत चिंचवड येथील स्नेह फ्लोरिस्टचे संचालक पंढरीनाथ म्हस्के यांना ‘इंडियन फ्लोरल डिझाईन चॅम्पियनशिप अवॉर्ड 2020’ने गौरविण्यात आले. हैद्राबाद येथे झालेल्या स्पर्धेत त्यांचा गौरव करण्यात आला.

फ्लोरिकल्चर टुडे या मासिकाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या पंधराव्या फ्लोरा एक्स्पोमध्ये त्यांनी ‘एडिटर्स डेस्क’ व ‘फिनिक्स बर्ड’ ही पारंपरिक पुष्परचना सादर केली होती. स्पर्धेमध्ये देशभरातून 15 स्पर्धक सहभागी झाली होते. ‘गो फाफर फ्रेश, स्टॉप आर्टिफिशियल अँड प्लास्टिक फ्लॉवर्स’ ही या प्रदर्शनाची संकल्पना होती.

पंढरीनाथ म्हस्के म्हणाले, “संकल्पना आवडल्याने मी या स्पर्धेत सहभागी झालो. केवळ स्थानिक शेतक-यांनी उत्पादित केलेली ताजी फुले व फोलिएज वापरून मी कलाकृती तयार केली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.