Maval : तिकोणागडाला बसवण्यात आले सुरक्षाव्दार; उद्घाटन सोहळा उत्साहात

एमपीसी न्यूज – छत्रपती शिवजी महाराजांच्या प्रिय गडांपैकी एक अशा तिकोणागडावर अखेर सुरक्षाव्दार बसवण्यात आले. लोकसहभाग आणि आमदार सुनील शेळके यांच्या मदतीने सुमारे दीड लाख रूपयांचा मजबूत व गडास साजेसा असा दरवाजा बसवण्यात आला. या सुरक्षाव्दाराचे उद्घाटन मावळ तालुक्याचे आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते करण्यात आले.

या सोहळ्यासाठी शिवजन्मोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड, आग्राविर मारुती गोळे, वेस्टर्न घाट रनिंग फांऊंडेशन व कान्होजी जेधे यांचे वंशज दिग्विजय जेधे, शिवजन्मोत्सव समिती सदस्य अनिल पवार व मदार मते, अँन्टी करप्शन ब्युरो पुणेचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत चौधरी, डॉ.सचिन जोशी, डॉ. राजेन्द्र जाधवर आदि मान्यवर उपस्थित होते.

गडावरील मुक्त प्रवेशामुळे गडावर अस्वच्छता पसरण्याचे प्रमाण वाढत चालले होते तसेच रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत समाजकंटकांकडून वास्तूंची नासधूस केली जाऊ नये आणि व्यसनी लोकांकडून गडाचा गैरवापर होऊ नये व गडाचे पावित्र्य जपले जावे या उद्देशाने गडाच्या प्रवेश मार्गात सुरक्षाव्दार बसवणे गरजेचे होते. आमदार सुनील शेळके यांनी वैयक्तीक दिलेल्या एक लाख रूपये व इतर शिवभक्तांनी दिलेल्या आर्थिक मदतीतून दीड लाख रूपयांचे मजबूत सुरक्षाव्दार तिकोणागडावर बसवण्यात आले.

सुरक्षाव्दाराचे उद्घाटन मावळ तालुक्याचे आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर गडभटकंती दुर्गसंवर्धन संस्थेच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या गडावरील डागडुजी कामाच्या प्रतिकृतीचे अनावरणही यावेळी करण्यात आले. मावळातील सर्व किल्ल्यांच्या संवर्धना करिता स्व स्तरावर मदत करूच तसेच शासन स्तरावरही पाठपुरावा करू, असे आश्वासन सुनील शेळके यांनी यावेळी दिले.

यावेळी गडासाठी कामकरणा-या गुरूदास मोहोळ यांना महाराष्ट्र गिरीभ्रमण संस्थेच्या वतीने ‘दुर्गवीर’ हा पुरस्कर देऊन गौरवण्यात आले. तसेच गडसंवर्धनात मोलाची मदत व उल्लेखनीय काम करणाऱ्यांचा सन्मानही याप्रसंगी करण्यात आला.

कार्यक्रमावेळी इतिहास अभ्यासक अॅड. रविंद्र यादव यांचे दरवाजा इतिहास माहितीपर व्याख्यान झाले. उद्घाटन सोहळ्या निमित्त वडगाव मावळ येथील उद्योजक विशाल लोकरे यांनी गडावर कायम स्वरूपी ठेवण्याकरीता शिवाजी महाराज यांची मूर्ती भेट केली. सोहळ्यास उपस्थित शिवभक्तांनीही गडसंवर्धनाचे कामा करिता रोख पन्नास हजार रूपये निधी म्हणून देऊ केला. सामूहिक भोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली. सदर सोहळ्याचे सोनाली ओझरकर, छाया जाधव, मनिषा आवारे, आशिष मोरे, विनायक हिरे, यांनी नियोजन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.