Pimpri News : आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेकडून कामगारांच्या प्रश्नांबाबत दिल्लीत बैठक

एमपीसी न्यूज – जगभरात आणि  देशभरात संघटित, असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगार संघटना, फेडरेशन यांच्यामुळेच कामगारांचे हक्क अबाधित (Pimpri News) राहण्यास मदत होत आहे, हा प्रवास निरंतर ठेवून कामगारांचे जीवन सुकर होण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे असे मत इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन चे संचालक सतोसी साकाशी यांनी व्यक्त केले.

इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन कडून असंघटित कामगार सामाजिक सुरक्षा याबाबत दिल्ली येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी आशिया खंडप्रमुख  सुलतान अहमद, संचालक सी.वैभव नॅशनल  हॉकर फेडरेशनचे राष्ट्रीय महासचिव शक्तिमान घोष, कामगार नेते काशिनाथ नखाते,जम्मू आनंद,मनीष सिंग, पि.सिल्विलंम, ईनायत अली, विनिता  बाळेकुंद्री, प्रताप साहू ,इरफान चौधरी बैठकीस उपस्थित होते.

इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन ही संयुक्त राष्ट्रांची एक विशेष संस्था असून जगभरातील कामगार व मजूर वर्गाच्या समस्या सोडवण्यासाठी प्रामुख्याने काम अनेक वर्षांपासून करते आहे. कामगारांसमोरील आव्हाने संकटे दूर करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत शक्तिमान घोष यांनी मांडले.

Chinchwad Bye-Election : चिंचवडची जनता भाजप, राष्ट्रवादीला जागा दाखवेल – राहुल कलाटे

नखाते यांनी  विशेषतः असंघटित कामगारांतील फेरीवाला, मजूर,घरेलू कामगार, बांधकाम कामगार,ऑटो रिक्षा चालक, सफाई कामगारांचे जीवन धोकादायक असून अपघाती मृत्यू ची आकडेवारी वाढत चालली आहे त्यांचेसाठी सामाजिक सुरक्षा कायदा होणे गरजेचे असून त्या दृष्टीने आय. एल.ओ. कडून  प्रयत्न व्हावेत.

बैठकी दरम्यान जगातील विविध कामगार संघटना संघर्ष करीत असून  त्यांना मार्गदर्शक ठरत असलेल्या जगातील काही कायद्याचा संदर्भ घेऊन पुढे जाता येईल. फेरीवाला कायद्याचे अंमलबजावणीसाठी योजना व नियमलागू करणे गरजेचे आहे. सामान्य कामगार व या क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी पुढील कालावधीमध्ये दोन दिवशी एक कार्यशाळेचे आयोजन करण्याबाबत नियोजन करण्यात येईल असे आयोजकांनी स्पष्ट केले. देशभरातून विविध भागतून आलेल्या सर्वांचे आभार व्यक्त करून बैठकीचा समारोप झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.