Chinchwad Bye-Election : चिंचवडची जनता भाजप, राष्ट्रवादीला जागा दाखवेल – राहुल कलाटे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील जनतेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या दोनही पक्षांचा कारभार बघितला आहे. हे दोनही पक्ष एकाच्या (Chinchwad Bye-Election) नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यामुळे चिंचवडची जनता पोटनिवडणुकीत या दोनही पक्षाला त्यांची जागा दाखवेल, असा दावा अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी केला.

माध्यमांशी बोलताना कलाटे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार व भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच शपथविधी केला होता. पहाटेच्या शपथविधीमुळे भाजपच्या व फडणवीस यांच्या जवळ कोण आहेत, हे उभ्या महाराष्ट्राने बघितले.  राष्ट्रवादीची भूमिका नेहमीच संशयास्पद राहिली आहे.

Chinchwad Bye Election :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतल्या शिवसेना पदाधिका-यांच्या गाठीभेटी

महाविकास आघाडीकडून मी प्रबळ दावेदार असताना आणि मलाच उमेदवारी मिळावी अशी जनतेची भावना असतानाही राष्ट्रवादीने मला उमेदवारी दिली नाही. उमेदवार ठरविण्यातही भाजपला सोईची भूमिका घेतल्याची चिंचवडच्या जनतेमध्ये जोरदार चर्चा आहे.

महापालिकेतील पाच वर्षातील भाजपा सत्ता काळातील भ्रष्टाचारावर राष्ट्रवादीने कितीवेळा आवाज उठविला, कोणते प्रकरण तडीस लावले. (Chinchwad Bye-Election) एक-दोन ठेके मिळवून भाजपच्या भ्रष्टाचाराला साथ देण्याचे कामच स्वत:च्या पक्षाच्या नगरसेवकांनी केले. आता प्रदेशाध्यक्षही भाजपच्या भ्रष्टाचाराविरोधात बोलण्याचे टाळतात. महापालिकेतील भ्रष्टाचारावर बोलत नाहीत. त्याचे गुपित जनतेला माहिती आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.