Pune Metro : पुणे मेट्रो धावणार कात्रजपासून निगडीपर्यंत, मार्गविस्तारास केंद्र सरकारचा ‘ग्रीन सिग्नल’

एमपीसी न्यूज : पुणे मेट्रो प्रकल्पाच्या बहुप्रतीक्षित पिंपरी ते निगडी आणि स्वारगेट ते कात्रज या दोन मार्गिकांच्या विस्तारासाठी अखेर केंद्र सरकारने एक पाऊल पुढे टाकले आहे. पंतप्रधान गतिशक्ती योजनेंतर्गत नेटवर्क प्लॅनिंग ग्रुप ने या दोन्ही प्रकल्पांना हिरवा कंदील दाखविला असून, (Pune Metro) केंद्र सरकारच्या स्तरावर आणखी काही मान्यता प्राप्त झाल्यानंतर विस्तारित मार्गांचा अहवाल अंतिम मान्यतेसाठी केंद्रीय मंत्रिमंडळासमोर सादर करण्यात येईल. त्यामुळे पुढील काही महिन्यांत या दोन्ही प्रकल्पांना गती मिळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

पुणे आणि पिंपरीतील अनुक्रमे कात्रज आणि निगडी येथील विस्तारित मार्गांचा प्रकल्प अहवाल वर्षभराहून अधिक काळ केंद्र सरकारच्या स्तरावर प्रलंबित होता. या प्रकल्पांना होणाऱ्या विलंबामुळे खर्च वाढत असून, नागरिकांना थेट ‘कनेक्टिव्हिटी’ मिळण्यात अडचणी निर्माण होणार आहेत. (Pune Metro) केंद्र सरकारच्या गतिशक्ती योजनेमध्ये या दोन्ही विस्तारित मार्गांचा समावेश केला गेला असून ‘नेटवर्क प्लॅनिंग ग्रुप’ने नुकतीच मान्यता दिलेल्या 63 प्रकल्पांमध्ये या दोन्ही मार्गांना ‘ग्रीन सिग्नल’ देण्यात आला आहे.

Pimpri News : आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेकडून कामगारांच्या प्रश्नांबाबत दिल्लीत बैठक

दरम्यान, याच बैठकीत पुणे-बेंगळुरू दरम्यानच्या नवा प्रस्तावित एक्स्प्रेस-वे (49 हजार कोटी रुपये) आणि पुणे-औरंगाबाद दरम्यानच्या नव्या महामार्गाला (12 हजार कोटी रुपये) मंजुरी देण्यात आली आहे. या महत्त्वाच्या प्रकल्पांना आता सार्वजनिक गुंतवणूक मंडळ (पब्लिक इन्व्हेस्टमेंड बोर्ड) आणि केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी गरजेची आहे.

स्वारगेट-कात्रज दरम्यानची स्टेशन

मार्केट यार्ड, चिंचवड, आकुर्डी,निगडी

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.