Pimpri News : पिंपरीत बुधवारी ‘जागतिक मराठी भूषण पुरस्कार’ सोहळा, शरद पवार राहणार उपस्थित

एमपीसी न्यूज – जागतिक मराठी अकादमी आणि डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरी यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या (बुधवारी) अमेरिकन संसदेचे नवनिर्वाचित पहिले (Pimpri News) मराठी खासदार, संशोधक व उद्योजक श्रीनिवास ठाणेदार यांना जागतिक मराठी भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

सकाळी 10 वाजता डॉ डी. वाय. पाटील विद्यापीठ प्रेक्षागृह ,संत तुकाराम नगर ,पिंपरी येथे होणाऱ्या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते श्रीनिवास ठाणेदार यांना सन्मानित करण्यात येणार आहे. डॉ.डी.वाय.पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ.पी.डी.पाटील आणि इतर मान्यवरांच्या उपस्थित हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

Pune Metro : पुणे मेट्रो धावणार कात्रजपासून निगडीपर्यंत, मार्गविस्तारास केंद्र सरकारचा ‘ग्रीन सिग्नल’

पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे उपस्थित असणार आहेत.  या कार्यक्रमानंतर श्रीनिवास ठाणेदार यांची प्रकट मुलाखत ज्येष्ठ कवी व जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे व सचिन इटकर घेणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.