Raigad News : इर्शाळवाडी दरड दुर्घटना; जखमींवर नवी मुंबईत उपचार सुरू; नातेवाईकांनी नियंत्रण कक्षाशी संपर्क करण्याचे आवाहन 

एमपीसी न्यूज – रायगड जिल्ह्यातील खालापूर जवळ इर्शाळवाडी गावात बुधवारी (दि. 19) रात्री साडेदहा ते अकरा वाजताच्या सुमारास दरड कोसळली. मातीच्या ढिगार्‍याखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. जखमींवर नवी मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नातेवाईकांनी नियंत्रण कक्षाशी संपर्क करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Pimple Saudagar : पिंपळे सौदागर येथे भूस्खलन होवून रस्ता खचला

या घटनेत शंभर पेक्षा अधिक नागरिक अडकले असल्याची शक्यता आहे. त्यातील 75 जणांना बाहेर काढण्यात आले असून दुर्दैवाने पाच जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेतील जखमींच्या नातेवाईकांनी इर्शाळवाडी गावाकडे धाव घेतली आहे. आणखी काही जण दरडी खाली अडकले असून त्यामध्ये सहा ते सात लहान मुलांचा समावेश आहे.

 

अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी बचाव पथकांना अडथळा होणार नाही याची खबरदारी प्रशासनाने घेतली आहे त्यामुळे घटनास्थळी जास्त गर्दी करू नये असे आवाहन करण्यात आले आहे.

 

या घटनेतील जखमींवर नवी मुंबई येथील रुग्णालयात उपचार केले जात आहेत. नवी मुंबई येथील रुग्णालयात सुमारे 100 जणांना उपचार करता येतील याची व्यवस्था करण्यात आली आहे.

 

खालापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चौक दुरक्षेत्र येथे तात्पुरते नियंत्रण कक्ष उभारण्यात आला आहे. इर्शाळवाडी दुर्घटनेतील जखमींच्या नातेवाईकांनी या नियंत्रण कक्षाशी (8108195554) संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.