Maharashtra : मुसळधार पावसामुळे दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षा ढकलल्या पुढे

एमपीसी न्यूज – राज्यात काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा दिल्याने दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेतील आज (गुरुवारी) होणारी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य (Maharashtra ) मंडळाने घेतला. दहावीचे पुढे ढकलण्यात आलेली परीक्षा 2 ऑगस्टला, तर बारावीची परीक्षा 11 ऑगस्ट होईल, असेही राज्य मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले.

Raigad News : इर्शाळवाडी दरड दुर्घटना; जखमींवर नवी मुंबईत उपचार सुरू; नातेवाईकांनी नियंत्रण कक्षाशी संपर्क करण्याचे आवाहन 

राज्यातील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे  काही ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. त्याशिवाय हवामान विभागाने काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यातील शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे.

 

त्यामुळे राज्य मंडळातर्फे घेण्यात येत असलेल्या पुरवणी परीक्षेतील बारावीची परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघातर्फे करण्यात आली होती.   या पार्श्वभूमीवर दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेतील गुरुवारी (20 जुलै) होणारी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य मंडळाने घेतला. दहावीचे पुढे ढकलण्यात आलेली परीक्षा 2 ऑगस्टला, तर बारावीची परीक्षा 11 ऑगस्ट होईल, असेही स्पष्ट करण्यात आले.

मात्र या दोन दिवसाच्या परीक्षा वगळता अन्य उर्वरित परिक्षांचे वेळापत्रकात कोणताही बदल केलेला नाही,याची पालकांनी व विद्यार्थ्यांनी दखल घ्यावी असे आवाहान राज्य मंडळाकडून करण्यात आले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.