Raigad News : इर्शाळवाडी दरड दुर्घटनेत मृतांची संख्या 26

एमपीसी न्यूज – रायगड जिल्ह्यातील खालापूर जवळ इर्शाळवाडी गावात बुधवारी (दि. 19) रात्री दरड कोसळली. या घटनेत (Raigad News) आतापर्यंत 26 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अजूनही 70 पेक्षा अधिक नागरिक बेपत्ता आहेत. मागील तीन दिवसांपासून बचावकार्य सुरू आहे.

इर्शाळवाडी गावात 228 जण राहतात. त्यात सहा वर्षाखालील 25 मुले आहेत. दरड कोसळण्याची घटना घडत असताना 70 जण सुरक्षित ठिकाणी गेले. दरम्यान अनेक घरे दरडीखाली सापडली. दरडीखाली अडकलेल्या सुमारे 100 जणांना बाहेर काढण्यात आले आहे. यातील जखमींवर शासकीय खर्चाने उपचार केले जात असून मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान यामध्ये 26 जणांचा मृत्यू झाला आहे.

Hinjawadi : गृहनिर्माण संस्थांमध्ये 100 टक्के मतदार नोंदणीसाठी सदस्यांनी पुढे यावे – मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

शुक्रवार (दि. 21) पर्यंत 21 जणांचे मृतदेह काढण्यात आले होते. शनिवारी देखील भराव उपसून शोधकार्य सुरू होते. शनिवारी आणखी पाच जणांचे मृतदेह सापडले आहेत. या घटनेत 21 जण जखमी झाले आहेत. जखमींवर नवी मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मातीच्या ढिगार्‍याखाली अडकलेल्या अन्य व्यक्तींचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

घटनास्थळी जेसीबी सारखे यंत्र जाऊ शकत नसल्याने नागरिकांच्या मदतीने ही दरड हटविण्यात येणार आहे. सुमारे 650 जण या बचाव कार्यात सहभागी झाले आहेत. हा परिसर अत्यंत दुर्गम ठिकाणी (Raigad News) असल्याने तिथे जाण्यासाठी देखील अनेक अडचणी येत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.