Chakan Police : महिलेकडे लग्नाचा  तगादा लावत तिच्याशी गैरवर्तन करणाऱ्या वर गुन्हा

एमपीसी न्यूज – महिलेकडे लग्नाचा तगादा लावत तिला धमकावणे व तिच्याशी गैरवर्तन करणाऱ्या आरोपीवर चाकण पोलीस (Chakan Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार सप्टेंबर 2022 ते आज अखेर पर्यंत चाकण परिसरात घडला.

Pimpri Chinchwad RTO News : ओला, उबरसारख्या ॲप आधारीत वाहनांसाठी अभिप्राय पाठवा; पिंपरी-चिंचवड आरटीओचे आवाहन

याप्रकरणी बुधवारी (दि.17) चाकण पोलीस ठाण्यात 25 वर्षीय पीडितेने फिर्याद दिली असून सत्यम दत्तात्रय कड (रा. चाकण) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा पती कारागृहात असल्याचा फायदा घेत आरोपीने फिर्यादी शी जवळीक साधत त्यांच्याकडे लग्नाचा तगादा लावला. तसेच घरी येवून तुला व तुझ्या मुलाला मारून टाकीन अशी धमकी देत पीडितेवर लैंगीक अत्याचार केले. यावरून चाकण पोलीस (Chakan Police) ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.