Lonavala : पुण्याला जाते सांगून गेलेली 47 वर्षीय महिला बेपत्ता, शोध सुरू

एमपीसी न्यूज – पुण्याला जाते म्हणून बाहेर पडलेली महिला घरी परतली नाही. ही घटना कैलास नगर, लोणावळा (Lonavala) येथे घडली आहे.
Chakan Police : महिलेकडे लग्नाचा तगादा लावत तिच्याशी गैरवर्तन करणाऱ्या वर गुन्हा
संगीता बबन घरदाळे (वय 47, रा. कैलास नगर, लोणावळा (Lonavala) असे बेपत्ता झालेल्या महिलेचे नाव आहे. त्यांची उंची 4 फूट 5 इंच, रंग गोरा, केस काळे लांब, अंगावर जांभळ्या रंगाची साडी व पांढऱ्या रंगाचा स्कार्फ आहे.
संगीता घरदाळे बुधवारी (दि. 17) सकाळी दहा वाजताच्या सुमारास घरातून बाहेर पडल्या. पुण्याला जाते असे सांगून त्या घराबाहेर पडल्या होत्या. मात्र रात्री उशिरापर्यंत त्या पोहोचल्या नसल्याने नातेवाईकांनी परिसरात शोधाशोध केली.
मात्र त्या भेटल्या नाहीत. वरील वर्णनाच्या महिलेबाबत माहिती मिळाल्यास (Lonavala) सूरज घरदाळे (9764938524) यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.