बंद घराचे लॉक तोडून दागिने चोरीला

एमपीसी न्यूज – भोसरीतील आदर्श नगर परिसरात बंद घराचे कुलुप तोडून चोरट्यांनी घरातील सोन्या चांदीचे दागिने चोरून नेले आहेत. ही चोरी 27 ते 28 नोव्हेंबर च्या दरम्यान अक्षय नगर येथील आदर्श कॉलनी येथे घडली.

याप्रकरणी भरत भिमराव सोनवणे (वय 32 रा. आळंदीरोड, भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्या विरोधात तक्रार दिली आहे.

Chakan News : कंपनीतून शोरूमसाठी निघालेली बोलेरो चालकानेच पळवली

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे घर बंद असताना चोरट्याने घराचे लॉक तोडून घरात फ्रवेश केला. त्याने घराच्या हॉलमधील कपाटाच्या लॉकरमधून 81 हजार रुपयांचे सोन्याचे व चांदीचे 1 तोळ्याचे दागिने, रोख रक्कम चोरून नेली.यावरून भोसरी पोलीस ठाण्यात गुन्ह दाखल कऱण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.