Chinchwad News : पिस्टल व जिवंत काडतुसासह एकाला चिंचवड येथून अटक

एमपीसी न्यूज –  गावठी बनावटीची पिस्टल व जिवंत काडतूसे यांच्यासह (Chinchwad News) एकाला शस्त्र विरोधी पथकाने चिंचवड येथून अटक केली आहे.

सुशील मारूती सरोदे (वय 31 रा. चिंचवड) असे अटक आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस हवालदार चंद्रकांत मोतीराम गवारी यांनी फिर्याद दिली आहे.

बंद घराचे लॉक तोडून दागिने चोरीला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी चिंचवड येथील सुदर्शननगर येथून सोमवारी (दि.28) सायंकाळी सरोदे याला 25 हजार रुपयांची गावठी बनावटीची पिस्टल व 300 रुपयांचे जिवंत काडतूस असा एकूण 25 हजार 300 रुपयांच्या शस्त्रासह अटक केली आहे.(Chinchwad News) चिंचवड पोलीस ठाण्यात आर्म अक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.