Pune : भाजपच्या उत्तर पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी ज्योती जाधव यांची निवड

एमपीसी न्यूज –  भाजपच्या उत्तर पुणे (Pune) जिल्हा ग्रामीण उपाध्यक्षपदी तळेगाव दाभाडे येथील ज्योती सुरेश जाधव यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.

पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र  देण्यात आले. यावेळी माजी राज्यमंत्री संजय भेगडे, किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे, जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

ज्योती जाधव या तळेगाव दाभाडे येथील दिवंगत ज्येष्ठ नेते केशवराव वाडेकर यांच्या कन्या आहेत. त्या गेली 20 वर्ष भाजपमध्ये सक्रिय आहेत. त्यांनी आत्तापर्यंत भाजपमध्ये शहराध्यक्ष पदापासून ते प्रदेश उपाध्यक्ष पदापर्यंत विविध पदे भूषवली आहेत. राजकीय कारकिर्दीप्रमाणे सामाजिक कार्यात देखील त्या सक्रिय असून त्या लायन्स क्लबमार्फत अनेक सामाजिक कामात सहभागी होतात.

मागील पाच टर्ममध्ये  महाराष्ट्रात काम करत असताना सांगली, सातारा, कोल्हापूरमध्ये प्रभारी म्हणून काम पाहिले आहे. दोन महिन्यांपूर्वी झालेल्या भाजप प्रदेश कार्यकारणीमध्ये निमंत्रित सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती झाली आहे.

याविषयी बोलताना ज्योती जाधव म्हणाल्या की, मला मिळालेल्या संधीचे सोने करून, माझा जिल्हा व  तालुका सक्षम करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.