Kamsheth : कामशेत मध्ये गुरुसप्तमी महोत्सवाचे आयोजन 

गुरुसप्तमी रक्तदान शिबीर 

एमपीसी न्यूज – विश्वपुज्य प्रभू श्रीमद विजय राजेंद्र सूरी म.स यांच्या 19 व्या गुरुसप्तमी महोत्सवाचे आयोजन कामशेत येथे करण्यात  आले असून डॉ.विकेश कांतीलाल मुथा परिवार यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे रविवार ( दि. 13 ) रोजी  आयोजन  करण्यात  आले आहे.

शिबिराचे उदघाटन पोलीस निरीक्षक नीलकंठ जगताप  यांच्या हस्ते होणार असून करण ओसवाल, पारसमल परमार, सुकन  बाफना, अशोक गदिया, दिलीप  ओसवाल आदी उपस्थित राहणार आहेत.गुरुसप्तमी महोत्सव अंतर्गत सकाळ ते संध्याकाळ पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून यात भक्ताम्बर  पाठ, महामंगल पाठ, राजेंद्र सूरी  म.सा व नमीनाथ दादांची आरती, 57 तपस्वींची भव्य मिरवणूक, गुणानुवार सभा, संघ स्वामी  वात्सल्य, अष्टप्रकारची पूजा, तपस्वी गौरव समारंभ, महाआरती आदि कार्यक्रम  होणार आहेत. रात्री भक्ती भावना संगीतकार तरुणसिंग मोदी अँड पार्टी भक्तीसंगीताचा होणार आहे.

आयोजक कांचनबाई कांतीलाल मुथा, मुकेश मुथा, निलेश  मुथा, परेश मुथा यांच्यासह प्रमुख पाहुणे माजी मंत्री मदन बाफना, खासदार  श्रीरंग  बारणे, डॉ.श्रीकृष्ण जोशी, डॉ.अमोल अगरवाल, डॉ. नेमीचंद बाफना  आदि मान्यवर व जैन समाज असणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.