Karvenagar Crime News : पूर्ववैमनस्यातून टोळक्याचा तरुणावर कोयत्याने वार

एमपीसीन्यूज : पूर्ववैमनस्यातून सराईतासह त्याच्या साथीदारांनी तरूणावर कोयत्याने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना कर्वेनगर भागात घडली आहे.

याप्रकरणी रवींद्र वामन ढोले (वय १९, वारजे), सचिन दिलीप डोंगरे (वय २१, रा. कर्वेनगर गल्ली ५) व आकाश दिलीप डोंगरे (वय २३) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. हर्षल कंधारे (वय २५) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे.

संकेत कंधारे (वय २३) यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्षल आणि आरोपींचे काही दिवसांपूर्वी वाद झाले होते. त्याचा राग आरोपींच्या मनात होता. त्यावरूनच काल रात्री पावणे आठ वाजण्याच्या सुमारास हर्षल हा कर्वेनगर येथे थांबला असता आरोपींनी पुन्हा वाद घालत त्याच्या डोक्यात कोयत्याने वारकरून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.

याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी तिघांना पकडले असून, त्यांच्या साथीदारांचा शोध सुरू आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक बापू रायकर हे करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.