Pimpri Corona Update : शहरात आज 151 नवीन रुग्णांची नोंद, 105 जणांना डिस्चार्ज; 2 मृत्यू

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 151 नवीन रुग्णांची आज (बुधवारी) नोंद झाली आहे. यामुळे शहरातील आजपर्यंतची रुग्णसंख्या 97 हजार 326 वर पोहोचली आहे. उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 105 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शहरातील दोन जणांचा आज मृत्यू झाला आहे. त्यात पिंपळेसौदागर येथील 60 वर्षीय पुरुष आणि थेरगावातील 59 वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला.

शहरात आजपर्यंत 97 हजार 326 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 93 हजार 843 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 1766 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 735 अशा 2501 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 686 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालया मध्ये उपचार सुरू आहेत. तर, 2401 जणांचे चाचणी अहवाल प्रतिक्षेत आहेत.

दरम्यान, इंग्लंडहून मुंबईत उतरलेल्या पिंपरी- चिंचवड शहरातील 268 प्रवाशांचा शोध घेण्यात आला आहे. त्यापैकी सात प्रवाशांचे नमुने एनआयव्ही पुणे येथे UK स्ट्रेन करीता जिनोम सिक्वेसिंगसाठी पाठविले असता दोन अहवाल नकारात्मक व पाच अहवाल प्रलंबित आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.