Kelgaon: बीजेपी कडे खऱ्या अर्थाने ताकद असती ,लोकमत, जनमत असते तर त्यांनी कुटूंब फोडली नसती पार्टी फोडल्या नसत्या-रोहित पवार

एमपीसी न्यूज -केळगाव  येथील सुधीर मुंगसे निवासस्थान येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी -शरद पवार(Kelgaon) (खेड तालुका) आयोजित संवाद  सभेचे आयोजन करण्यात आले होते.
या संवाद सभेला मार्गदर्शन करताना आमदार रोहित पवार म्हणाले  माऊलींचे दर्शन घेतल्यानंतर नवीन ऊर्जा व प्रेरणा मिळाली.
कदाचित माऊलींचाच संदेश मला किंवा आपल्याला सर्वांना असेल आपण एक चांगल्या(Kelgaon) विचारा साठी लढत आहात लोकांसाठी लढत आहात पुढे कितीही मोठी बलाढ्य शक्ती असली तरी चांगल्या विचाराने तुम्ही लढत असल्यामुळे यश हे तुम्हालाच मिळेल असा आशीर्वाद   माऊलींने आपल्या सगळ्यांना दिला आहे.
आपण प्रत्येक संतांच्या बाबतीत बोलो,त्यांच्या आयुष्याचा विचार जर केला तर त्यांनी सर्वांनी असा संघर्ष केला आहे.संघर्ष हा ठराविक लोकांच्या विरोधातच त्यांनी केला. कोणासाठी केला? तर चांगल्या विचारासाठी व लोकांसाठी तो संघर्ष केला. त्या काळा मध्ये कोणाच्या विरोधात लढावं लागलं त्याचा अंदाज सर्वांना आहे.
पण ते अश्या कोणत्या व्यक्तीच्या विरोधात लढत नव्हते.संकोचित विचार असणाऱ्या ठराविक व्यक्तींच्या विरोधात ते लढत होते.लढत असताना त्यांना त्या काळा मध्ये  माऊलीं असतील तुकोबाराया असतील वा सर्व संत यांना नेहमी नेहमी ऐकावं लागलं.  तुम्ही तुमचे प्रवचन थांबवले नाही ,अध्यात्मिक मार्गदर्शन थांबवले नाही ,तर तुम्हाला आमच्या शक्तीला समोर जावे लागेल,आम्ही तुम्हाला अडचणीत आणू.अश्या प्रकारच्या धमक्या त्यावेळच्या संतांना त्या काळात ठराविक लोकांकडून दिल्या गेल्या. अशी परिस्थिती असताना सुध्दा लोक आपल्या बरोबर आहेत.आपण चांगल्या विचारासाठी लढत आहोत.
आपण कोणावर ही अन्याय करत नाही. हा विचार त्यांच्या मनामध्ये असल्यामुळे अश्या ते कुठेही शक्तींना ते घाबरले नाहीत.त्यांचे कार्य थांबले  नाहीत.त्यांनी त्यावेळेस जे कार्य थांबवले नाही. लोकांचा विचार केला म्हणून आज खऱ्या अर्थाने अध्यात्मिक विचार सर्वांना पहावयास मिळतो.
आखा महाराष्ट्र एकत्रित पाहायला मिळतो आहे.भागवत संप्रदाय आणि वारकरी संप्रदाय आपल्या या राज्यामध्ये असल्यामुळे तो विचार संतांचा या राज्या मध्ये असल्यामुळे,अनेक लोकांना समाजा समाजा मध्ये वाद निर्माण करून देण्याचा प्रयत्न ठरत असताना सुद्धा त्याला यश मिळत नाही.कारण संतांचे विचार या भूमी मध्ये रुजलेत,आपल्या रक्ता रक्तात ते रुजले आहेत. म्हणून बलाढय शक्त्या किती ही प्रयत्न केला धर्मवाद व जातीवाद या राज्या मध्ये करण्याचा ते त्यांना जमत नाही.
तालुकाध्यक्ष , सुधीर मुंगसे यांनी सांगितल्या प्रमाणे येथे काही लोक धमकी देतात भीती दाखवतात,बघतोच करतोच त्या मुळे मगाचेच उदाहरण दिले.  माऊलींच्या समोर सर्व नतमस्तक झाले आहे ,त्यांच्या विचारा समोर नतमस्तक झाले आहे. तुकारामांच्या येथे तसेच पंढरपूरला नतमस्तक झाले आहे. नतमस्तक होण्यासाठी केवळ नतमस्तक होत नसतो.आपण तेथून प्रेरणा घेतो.ती प्रेरणा आज खऱ्या अर्थाने घेण्याची गरज आहे. पुढे कितीही मोठी बलाढ्य शक्ती असेल ती केवळ स्वतःचा विचार करते.आपण सर्वजण लोकांची शक्ती मना मध्ये घेऊन,पाठींबा घेत या मोठ्या बलाढ्य शक्तीचा विरोधात संतांचे उदाहरण घेऊन ,संताची प्रेरणा घेऊन लढायचं आहे.ही गोष्ट मनामध्ये ठेवून  इतकेच बोलण्यासाठी मी येथे आलो आहे.
बिहार ,तेलंगणा किंवा इतर राज्य बघा तिथं काही संस्थांना पुढे करून नेत्यांना घाबरवण्याचा प्रयत्न केला जात आहे.जे नेते महिन्यांपूर्वी बोले बीजेपी सोबत जाणार नाही ते बीजेपी सत्तेत गेले  आहे.नितेश कुमार यांचे उदाहरण त्यांनी यावेळी दिले.

तसेच ते म्हणाले या महाराष्ट्रामध्ये काय झाले ?अजित दादांच्या बाबतीत घ्या ,नाही तर इतर ही जे नेते गेलेत ते लोकांच्या हितासाठी गेलेत का?त्यांच्यावर काय काय कारवाया झाल्या आहेत ?त्या आपल्या सर्वांना माहीत आहेत.त्यांना भीती होती आपल्याला जेल मध्ये जावे लागेल का काय?जेल मध्ये जाऊ नये म्हणून त्यांनी तो निर्णय घेतला व बीजेपी सोबत जाऊन बसले.आधी बीजेपी च्या विरोधात बोलत होता. दुधाचे भाव पडले बीजेपी च्या विरोधात, शेतकऱ्यांवर अन्याय झाला बीजेपी विरोधात, आता बरे सत्तेत जाऊन मोदी साहेब आवडायला लागले.आता मोठे वाटायला लागले.म्हणजे तुम्ही स्व:हितासाठी तिथे जाता.स्वतःच सर्व फिक्सिंग करता.मात्र पदाधिकारी, कार्यकर्ते व लोकांना वाऱ्यावर सोडून देता. तुम्ही स्वतः चा विचार करत असताना येथे तुम्ही धमकी देता हे पटून घेणार नाही.
महाराष्ट्र अस्मितेसाठी शरद पवार साहेब लढायला तयार आहेत ते तयार असतील तर आपण पळून जाऊन कसे चालेल?आणि मराठी  माणसं कधी पळत नाहीत हे आपण सर्वांनी पाहिले आहे.ऐकलं आहे. ते जेल ला घाबरले असले तरी आपण जेल ला घाबरत नाही.आपण तयारी दर्शवली तुम्हाला जी काही  कारवाई करायची ती करा आम्ही कोणाला घाबरत नाही.खऱ्या अर्थाने आम्ही मराठी माणस म्हणून स्वाभिमानी जगणारी माणसं आहोत.
आणि घाबरत नसतो मुख्य कारण हे आहे ,आम्ही काही चुकीचं केलंच नाही .आधी तुम्ही बीजेपी विरोधात बोलत होता.आता कारवाई झाल्या नंतर त्यांच्या बरोबर सत्तेत गेला व सत्तेत गेल्या नंतर साहेबांच्या विरोधात बोलायला लागलात.
आपला नेता तिथं लढत असताना सहज पणे तुम्ही बोलता आम्हाला काय मिळालं? पद सर्व तुम्ही घेतली.
अश्या परिस्थितीत पद घेऊन सुद्धा म्हणत आहे साहेबांनी आम्हाला काय दिले?तुम्हाला पद देऊन सुद्धा पोट भरत नसतील तर त्याला आम्ही काय करणार?साहेब जे काही लढत आहेत ते एका विचारा साठी लढत आहेत. साहेबांनी विचार घेतला निवृत्त व्हायचा ते करू शकतात घेऊ शकतात. पण त्यांना माहीत आहे साहेबांनी आज जर माघार घेतली तर प्रतिकामी विचारांची शक्ती आहे, भाजप ची जी शक्ती आहे ज्यांना महाराष्ट्रा मध्ये गटा गटा मध्ये जाती धर्मा मध्ये वाद निर्माण करून जी वैचारिक बैठक या राज्यात बसलेली आहे तीच ती मोडून काढायची आहे. तर पवार साहेबांनी माघार घेतली तर बीजेपी खूप मोठा फायदा होऊ शकतो.
या वया मध्ये  सुद्धा 84 वर्षाचा युवक आदर्श पवार साहेब लढत आहेत. आपल्या ला त्यांना पाठींबा द्यायचा आहे. त्यांचा सोबत लढायचे आहे.या विचार व लढया सोबत असतील व लोकां बरोबर असतील त्यांना प्रतिनिधित्व देणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
तसेच ते पुढे म्हणाले जी काही ताकद या नेत्यांच्या मागे बी जे पी ची आहे ती फक्त लोकसभे साठी देत आहे. वरून आदेश आलेत जास्तीत जास्त खासदार आपले निवडून आले पाहिजे.
  बीजेपी कडे खऱ्या अर्थाने ताकद असती लोकमत जनमत असते तर त्यांनी कुटूंब फोडली नसती पार्टी फोडल्या नसत्या.तसेच त्यांनी बिजेपी च्या दबाव तंत्रावर टीका केली.
  21तारखेला शरद पवार यांची सभा आंबेगाव ला होणार आहे. अमोल कोल्हे आपले उमेदवार राहणार आहेत ,ते येथून लढणार असल्याचे त्यांनी यावळी संवाद सभेत सांगितले.
यावेळी रा.यु.काँ.कार्याध्यक्ष रविकांत वरपे, जिल्हाध्यक्ष रा यु काँ.स्वप्निल गायकवाड, तालुकाध्यक्ष हिरामण आण्णा सातकर ,सुधीर मुंगसे व राषट्रवादीचे अनेक पदाधिकारी ,कार्यकर्ते उपस्थित होते.
https://www.youtube.com/watch?v=sWUz8e8nQQg&ab_channel=MPCNews

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.