Khalumbre: खालुम्ब्रे येथे तरुणाकडून 61 हजार रुपयांचा गुटखा जप्त

एमपीसी न्यूज – गुन्हे शाखा युनिट 3 च्या पथकाने कारवाई करत (Khalumbre)एक 25 वर्षीय तरुणाकडून 61 हजार रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. ही कारवाई  शुक्रवारी (दि.12) करण्यात आली.
याप्रकरणी शुभम देवदत्त खरात (वय 25 रा. खालुंब्रे , खेड) याच्यावर(Khalumbre) गुन्हा दाखल केला आहे,.याप्रकरणी पोलीस शिपाई राहूल सुर्यवंशी यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी याने गजानन पवार याच्याकडून विक्रीसाठी 61 हजार 220 रुपयांचा गुटखा घेत विक्रीसाठी स्वतःच्या ताब्यात बाळगून होता.पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.