Chinchwad: गॅसचा काळाबाजार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा, सव्वा तीन लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – गॅसचा काळाबाजार केल्याप्रकरणी  एकावर गुन्हा (Chinchwad)दाखल केला असून पोलिसांनी सव्वा तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई अमंली पदार्थ विरोधी पथकाने  शुक्रवारी (दि.12) चिचंवड, बिजलीनगर येथे केली आहे.

याप्रकरणी मुकेश सुरेश पवार (वय 24 रा. बिजलीनगर) या दुकान चालकावर (Chinchwad)गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई सदानंद रुद्राक्षे यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Pimpri : पदवी समारंभ म्हणजे शिक्षणाचा शेवट नाही – रामनाथ कोविंद

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा बिजलीनगर येथे मल्हार गॅस सर्विस नावाचे दुकान चालवतो. तो बेकायदेशीरपणे कोणती ही सुरक्षितता न बाळगता मोठ्या गॅस सिलेंडर मधून छोट्या सिलेंडरमध्ये गॅस भरून त्याची विक्री करत होता. यावरून पोलिसांनी कारवाई करत त्याच्याकडून 29 घरगुती सिलेंडर,3 व्यावसायिक सिलेंडर,  72 लहान सिलेंडर असा एकूण 3 लाख 20 हजार 110 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.चिचंवड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.