Khed ncp : खेड तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचा जाहीर निषेध

एमपीसी न्यूज : राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत खालच्या भाषेत टीका केल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. एका वृत्तावाहिनीशी बोलताना सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्याबद्दल अपशब्द काढले आहेत. (Khed ncp) या विधानानंतर सत्तार यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली असून, राजकीय वातावरण तापलं आहे.यानिमित्ताने खेड येथील पंचायत समिती समोर राष्ट्रवादी महिला गटाच्या वतीने कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचा जाहीर निषेध केला गेला.

राष्ट्रवादी महिला गटाच्या वतीने सोमवार सायंकाळी 5 वा. खेड येथील पंचायत समिती समोर कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचा जाहीर निषेध केला गेला.आणि त्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले. व या राष्ट्रवादी खेड तालुक्यातील महिलांच्या वतीने खेड पोलिस स्टे.येथे निवेदन देऊन गुन्हा दाखल करण्यासाठी पत्र देण्यात आले.

Police dept transfer : पिंपरी-चिंचवड पोलिस उपायुक्त मंचक इप्पर यांची बदली

यावेळी खेड तालुका महिला अध्यक्ष संध्या जाधव, शहर अध्यक्ष  चाकण आळंदी – रूपाली पानसरे,स्मिता शहा,पूणे जिल्हा उपाध्यक्ष कांचन  ढमाले, बेबीताई कड , (Khed ncp) मंगल जाधव,मनीषा टाकळकर ,राष्ट्रवादी युवा नेते मयूर मोहिते आणि सर्वं राष्ट्रवादी महिला कार्यकर्त्या उपस्थित  होत्या. याबाबत माहिती राष्ट्रवादी.श. अध्यक्ष रुपाली पानसरे यांनी दिली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.