Police dept transfer : पिंपरी-चिंचवड पोलिस उपायुक्त मंचक इप्पर, आनंद भोईटे यांची बदली

एमपीसी न्यूज :  पिंपरी-चिंचवड परिमंडळ 1 पोलिस उप आयुक्त मंचक इप्पर व पोलीस उप आयुक्त आनंद भोईटे यांची बदली झाली आहे. तर विवेक पाटील व स्वप्ना गोरे यांची (Police dept transfer) पिंपरी-चिंचवड उप आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली आहे.  मंचक इप्पर यांची पोलीस अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, नाशिक या पदावर बदली करण्यात आली आहे.तर आनंद भोईटे यांची अप्पर पोलीस अधीक्षक, बारामती, पुणे (ग्रामीण) या पदावर बदली करण्यात आली आहे.  पुणे पोलीस उप आयुक्त प्रियंका नारनवरे, भाग्यश्री नवटके, पौर्णिमा गायकवाड, नम्रता पाटील (चव्हाण), राहुल श्रीरामे, सागर पाटील यांचीही बदली करण्यात आली आहे.

महाराष्ट्र पोलीस अधिनियम (1951 चा 22) याच्या कलम 22 न यामधील तरतुदीनुसार भारतीय पोलीस सेवा( भा.पो.से.) / राज्य पोलीस सेवा (रापोसे) 104 अधिकाऱ्यांची आज महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने बदली केली आहे.तसेच नऊ राज्य पोलीस सेवा (रापोसे)  अधिकाऱ्यांची महाराष्ट्र शासनाने बदली केली असून त्यांच्या पदस्थापनेचे आदेश स्वतंत्रपणे काढण्यात येणार आहेत.

Section 144 : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात कलम 144 लागू

पुणे शहराचे पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांची पिंपरी-चिंचवड पोलीस उपायुक्त या पदावर बदली करण्यात आली आहे. स्वप्न गोरे प्राचार्य पोलीस प्रशिक्षण केंद्र सोलापूर (Police dept transfer) यांची पोलीस उपायुक्त पिंपरी-चिंचवड या पदावर बदली करण्यात आली आहे. आनंद भोईटे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ 2, पिंपरी-चिंचवड यांची अप्पर पोलीस अधीक्षक, बारामती, पुणे (ग्रामीण) या पदावर बदली करण्यात आली आहे. तर पिंपरी-चिंचवड परिमंडळ 1 चे पोलीस उप आयुक्त मंचक इप्पर यांची पोलीस अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, नाशिक या पदावर बदली करण्यात आली आहे.

7 पुणे पोलीस उप आयुक्त यांची बदली 

प्रियंका नारनवरे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ 1, पुणे शहर यांची समादेशक, रा. रा पोलीस बल गट क्रमांक 4, नागपूर या पदावर बदली करण्यात आली आहे.

भाग्यश्री नवटके, पोलीस उप आयुक्त, आर्थिक गुन्हे शाखा, पुणे शहर यांची समादेशक रा. रा. पोलीस बल गट क्र. 17 चंद्रपूर या पदावर बदली करण्यात आली आहे.

पौर्णिमा गायकवाड, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ 3,  पुणे शहर यांची समादेशक रा. रा. पोलीस बल गट क्रमांक 12, हिंगोली या पदावर बंदी करण्यात आली आहे.

नम्रता पाटील (चव्हाण), पोलीस उप आयुक्त, पुणे शहर यांची पोलीस अधीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, महाराष्ट्र राज्य, मुंबई या पदावर बदली करण्यात आली आहे.

राहुल श्रीरामे, पोलीस उप आयुक्त, वाहतूक, पुणे शहर यांची पोलीस अधीक्षक, महाराष्ट्र राज्य, सुरक्षा महामंडळ, मुंबई या पदावर बदली करण्यात आली आहे.

सागर पाटील, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ दोन पुणे शहर यांची पोलीस उप आयुक्त, अमरावती शहर या पदावर बदली करण्यात आली आहे.

विवेक पाटील, पोलीस उप आयुक्त, पुणे शहर यांची पोलीस, उप आयुक्त, पिंपरी चिंचवड या पदावर बदली करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.