Kondhwa : कोंढव्यातील श्रीराम मंदिरात प्राण प्रतिष्ठा निमित्त भव्य कलश शोभायात्रा

एमपीसी न्यूज – प्रभू श्रीराम अयोध्येतील राम मंदिरात येत्या (Kondhwa)सोमवारी (दि. 22 जानेवारी) विराजमान श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळ्याने संपूर्ण देश राममय झाला.

हा आनंदसोहळा साजरा करण्यासाठी प्रभू श्रीराम प्राण प्रतिष्ठा महोत्सवाचे (Kondhwa)आयोजन करण्यात आले. सांळूखे विहार येथून कौसर बाग, कोंढवा, पुणे येथील राम दरबार मंदिर (संकट हरण महादेव मंदिर) पर्यंत भव्य कलश शोभायात्रा काढण्यात आली.

Pune : प्रत्येक चित्रपट मुलासारखा – फ्रान बोर्गीया

यावेळी आतिशबाजी करित नाचत जल्लोष साजरा करण्यात आला. या प्राण प्रतिष्ठा महोत्सवाचे आयोजन पवन बन्सल, नरेंद्र गोयल, माजी नगरसेवक तानाजी लोणकर केले असुन यावेळी पवन चमाडिया, गुंजन नवल, अरविंद जैन, माजी आमदार महादेव बाबर, साईनाथ बाबर आदी उपस्थित होते.

प्राण प्रतिष्ठा महोत्सव अंतर्गत दुपारी 12.00, थेट प्रक्षेपण दाखविण्यात आले. दुपारी 4 वाजता कलश यात्रा साळुंके विहार ते माता मंदिर रामदरबार मंदिर पर्यंत काढण्यात आली ज्यात शेकडो महिलांनी सहभाग घेतला होता. तसेच संध्याकाळी 5 वाजता भजन, संध्याकाळी 6 वाजता हजारो दिव्यांनी दीपोत्सव साजरा करण्यात आला. अयोध्येतील शरयूतीरी महाआरती आणि प्रसादाचे आयोजन केले गेले.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.