Pune : प्रत्येक चित्रपट मुलासारखा – फ्रान बोर्गीया

एमपीसी न्यूज – “माझ्यासाठी प्रत्येक चित्रपट (Pune) हा माझ्या मुलासारखा असतो. तो पूर्णत्वास घेऊन जाणे, हे खूप कठीण असते. तरीही हा अनुभव जगण्यासाठी, मी हा खटाटोप पुन्हा करेन.”, असे मत फ्रान बोर्गीया यांनी व्यक्त केले.

फ्रान बोर्गीया यांनी दिग्दर्शित केलेला ‘टुमारो इज अ लॉंग टाईम’, हा चित्रपट पुणे येथे सुरू असलेल्या २२ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झाला. त्यानंतर ते बोलत होते. चित्रपटाविषयी बोलताना ते म्हणाले, “हा चित्रपट मुलगा आणि वडील यांच्या भावनिक नात्यावर आधारित आहे. समाजात प्रतित होणाऱ्या भावनिक नात्यांवर लिहिणे, चित्रित करणे, एक चित्रपट निर्माता म्हणून खूप कठीण आहे. आम्हाला एका तुटलेल्या कुटूंबातील भावनिक बंध दाखवायचे होते, जे खुप कठीण होते. मी कथेशी खूप संलग्न झालो कारण माझे संगोपन आणि माझ्या कुटुंबाशी असलेल्या नातेसंबंध हे या कथेतून मला जसेच्या तसे दिसत होते. या कथेवर आम्ही ७ वर्षे काम केले होते. कोरोनामुळे खंड पडला तरीही आम्ही हा चित्रपट पुर्ण केला.”

Pune : रामगीते, रामायण नृत्य, महाआरती व शंखनादातून आनंदोत्सव

एका 16 वर्षीय मेंग नावाच्या मुलाच्या आयुष्यात घडून येणाऱ्या वेगवेगळ्या प्रसंगाविषयी हा चित्रपट आपल्याला सांगतो. काहीही घडलं तरी आयुष्याचा प्रवास सुरू राहायला पाहीजे, हे सुंदररित्या चित्रित केलंय. हा चित्रपटामध्ये लिऑन (Pune)  दाई, एडवर्ड टॅन, ज्यूलियस फू, लेखराज सेखर आणि निओ स्वी लीन यांनी भूमिका केल्या आहेत.
आई नसताना वाढलेला मेंग आणि त्याची भावनिक गुंतागुंत, वडिलांसोबतचे त्याचे नाते आणि वडीलांनंतरचे त्याचे जग या सगळ्यांची गुंफण प्रेक्षकांना खिळवून ठेवते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.