Maharashtra : मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण करण्यासाठी जनजागृती

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार (Maharashtra) मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण करणेची प्रत्यक्ष कार्यवाही दि. 23 जानेवारी पासून करण्यात येत आहे. याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करणे व सहकार्यासाठी आवाहन करणे गरजेचे आहे. या कामासाठी महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडे मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्याचे काम सोपवले आहे.

त्यानुसार पुणे शहरामध्ये देखील मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकाचे सर्वेक्षण होत आहे. हे सर्वेक्षण दिनांक 23 जानेवारी ते 31 जानेवारी  या कालावधीत पुणे मनपा मार्फत नियुक्त केलेल्या 2007 प्रगणकामार्फत पूर्ण करण्यात येणार आहे. हे सर्वेक्षण मनपा हद्दीतील घरोघरी जाऊन मोबाईल ॲप वर livedata entry मार्फत करण्यात येणार आहे.

Pune : प्रत्येक चित्रपट मुलासारखा – फ्रान बोर्गीया

तरी सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, यादरम्यानच्या कालावधीत आपण घरी उपस्थित राहून सर्वेक्षणासाठी येणाऱ्या मनपाच्या प्रगणकास माहिती देऊन (Maharashtra) सर्वेक्षणासाठी सहकार्य करावे. या प्रगणकाकडे महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाने दिलेले ओळखपत्र असणार आहे. तसेच सर्वेक्षणासाठी भेट दिलेल्या या घरावर MSBCC या पद्धतीची निशाणी नोंदविणार आहे. तरी, पुणे महानगरपालिकेच्या प्रगणकानां सर्वेक्षणासाठी सहकार्य करावे, अशी विनंती पुणे मनपा उप आयुक्त (निवडणूक) यांनी केली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.