Pune : दिल्ली येथील राष्ट्रीय छात्र सेनेतील प्रजासत्ताक दिन शिबिरात फर्ग्युसन महाविद्यालयाच्या कॅडेट्सचा डंका; एकाच वेळी चार कॅडेट्सचा प्रथमच सहभाग

एमपीसी न्यूज – दिल्ली येथील राष्ट्रीय छात्र सेनेतील(Pune) प्रजासत्ताक दिन शिबिरात फर्ग्युसन महाविद्यालयाच्या कॅडेट्सचा डंका वाजला आहे. एकाचवेळी चार कॅडेट्सचा प्रथमच सहभाग असेल.

ज्युनिअर अंडर ऑफिसर काजल सातपुते प्रजासत्ताकदिनी(Pune) “कर्तव्यपथावर” संचलन करणार आहे. तर, कॅडेट वाॅरंट ऑफिसर खुशी ठरली. “बेस्ट” कॅडेट. २८ जानेवारीला दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते “बॅटन” स्वीकारणार आहे.

यंदा प्रथमच फर्ग्युसन महाविद्यालयाचे चार कॅडेट्स ची आरडीसी 2024साठी निवड झाली आहे. त्यात आर्मी विंगची ज्युनिअर अंडर ऑफिसर काजल सातपुते ही यंदा कर्तव्यपथावर संचलन करणार आहे. फर्ग्युसन मविद्यालयात द्वितीय वर्ष विज्ञान शाखेत शिकत आहे. तिचे वडील निवृत्त शिक्षक आहेत आणि ति मुळची लातुरची आहे.

लिडिंग कॅडेट नचिकेत मेश्राम हा नेव्हल युनिटचा कॅडेट असुन त्याची “गार्ड ऑफ ऑनर” च्या चमूमध्ये निवड झाली आहे व तो ट्रूप कमांडर आहे . तो बीएस्सी द्वितीय वर्षामधे शिकत आहे. तो मुळचा भंडार्‍याचा आहे.

Express Way : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील गर्दी कमी करण्यासाठी रस्ते विकास महामंडळाचे प्लॅनिंग

कॅडेट कॅप्टन विवेक गांगुर्डे या नेव्हल युनिटचा कॅडेट असुन त्याची निवड पीएम रॅलीसाठी झाली असुन त्याचा शीप माॅडेलींग या स्पर्धेतही महत्वाचा सहभाग होता. तो सध्या तृतीय वर्ष प्राणीशास्त्र विभागात शिकत आहे.

फर्ग्युसन महाविद्यालयात यापुढे ही परंपरा अशीच चालू ठेवण्याचा निर्धार प्रथम वर्ष कॅडेट्सनी केला आहे. काजल,खुशी ,नचिकेत आणि विवेक हे आमच्यासाठी प्रेरणास्थानी असल्याचीही भावना सर्व कॅडेट्सनी व्यक्त केली.

छात्र सेना अधिकारी सब लेफ्टनंट सुनील होवाळ व लेफ्टनंट डॉ. नंदकुमार बोराडे यांनीही या निवडीबाबत आनंद व्यक्त केला आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन कुलकर्णी यांनी या कॅडेट्सचे अभिनंदन केले व भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. अशा कॅम्प्समध्ये जास्तीत जास्त कॅडेट्सनी निवडीसाठी प्रयत्न करावा असे आवाहन केले आहे.

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.