Kondhwa : कोंढव्यातील अनधिकृत शाळेचा पर्दाफाश; संस्थाचालक, मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – पुणे शहरातील कोंढवा (Kondhwa) परिसरात अनधिकृतरित्या चालणाऱ्या टीम्स तकवा इस्लामिक मतलब अँड स्कूल या शाळेच्या संस्थाचालक मुख्याध्यापक यांच्यासह इतरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे महापालिकेच्या शिक्षण विभागातील प्रशासकीय अधिकारी शंकर रामचंद्र मांडवे यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे.

टीम्स तकवा इस्लामिक मकतब अँड स्कूल शाळेचे संस्थाचालक उस्मान आत्तार, सचिव फिरोज खान यांच्यासह मुख्याध्यापक आणि इतरांवर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऑगस्ट 2022 पासून ही शाळा सुरू होती.

Hadapsar : फेसबुकवर झालेल्या ओळखीतून तरुणीवर लैंगिक अत्याचार

या शाळेच्या संस्था चालकांनी शिक्षण उपसंचालक यांची परवानगी न घेता, जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी यांची मान्यता न घेता शाळेत पहिली ते आठवीपर्यंतचे वर्ग चालू केले होते. एकूण 158 विद्यार्थ्यांना त्यांनी शाळेत प्रवेश दिले होते. दरम्यान या शाळेला मान्यता नसल्यामुळे यु-डायस नंबर नव्हता.

तसेच शाळेचा समावेश शासनाच्या सरल पोर्टलवर नसल्यामुळे विद्यार्थ्यांना सरल आयडी नव्हता. तसेच विद्यार्थ्यांना दुसऱ्या शाळेत प्रवेश मिळण्यास अडचण निर्माण होत होती. याशिवाय विद्यार्थ्यांना शाळेकडून दिलेले शाळा सोडल्याचे दाखले आणि इतर दाखले वैध आणि नियमानुसार नव्हते.
त्यामुळे संस्थाचालकांनी शासनाची परवानगी नसताना शासनाची आणि पालकांची दिशाभूल करून शाळा सोडल्याचे बोगस दाखले आणि इतर दाखले देऊन शासनाची व पालकांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला (Kondhwa) आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.