Latur Earthquakes : लातूरमध्ये काल रात्री दोनदा भूकंपाचे धक्के; गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

एमपीसी न्यूज : लातूरमधील हासोरी (Latur Earthquakes) भागांत मागील काही दिवसापासून भूकंपाचे धक्के जाणवू लागले आहेत. काल दिनांक 9 ऑक्टोबरच्या मध्यरात्री 1 वाजून तेरा मिनिटांनी हासोरी भागात भूकंपाचा दूसरा धक्का बसला. हा धक्का 2.1 रीश्टर स्केलचा होता. तर, रात्री 9 वाजून 57 मिनिटाला 1.9 रीश्टर स्केलचा पहिला धक्का जाणवला. हा धक्का हासोरी, बडुर, पिरपटेलवाडी आणि अंबुलगा ह्या मुख्य गावासह या परिसरातील अनेक गावांना जाणवला. यासोबतच भूकंपमापन केंद्रात या भूकंपाच्या हालचालींची नोंद घेण्यात आली.

आधी आवाज आता भूकंपाच्या धक्क्यांची मालिका सुरू – Latur Earthquakes

लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील हासोरि हे गाव बऱ्याच महिन्यांपासून भूकंपाने त्रस्त आहे. ग्रामस्थांनी याची तक्रार आधी प्रशासनाला दिली होती. त्यांच्यामते ही भुंकप नसून भूगर्भातील हालचालींचा आवाज आहे. मात्र 22 सप्टेंबर रोजी पहाटे 3 वाजून 38 मिनिटांनी 2.2 रिश्टर स्केलचा भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला आणि प्रशासन हादरून गेले. पत्रकार परिषदे मार्फत हे धक्के भुंकपाचे असल्याचे समोर आले. त्यामुळे प्रशासनाने या तालुक्यातील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Chakan Crime : सावरदरी भागात छेडछाड आणि संशयातून दोन तरुणांचा खून

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.