Russia VS Ukraine : रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध भडकण्याची शक्यता; एअर अलर्ट जारी

एमपीसी न्यूज : रशियन सैन्याने रविवारी युक्रेनमधील (Russia VS Ukraine) झापोरिझ्झ्या या आग्नेय शहरावर क्षेपणास्त्र हल्ला केला. अपार्टमेंट ब्लॉक्स आणि निवासी भागात हा हल्ला करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, युक्रेनमध्ये एअर अलर्ट घोषित करण्यात आला आहे. या क्षेपणास्त्र हल्ल्यात 13 जणांचा मृत्यू झाला आहे. सुमारे 89 जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये 11 मुलांचाही समावेश आहे.

24 फेब्रुवारीपासून युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध सुरू आहे. रशियन हल्ल्यांमुळे अनेक युक्रेनियन शहरे उद्ध्वस्त झाली आहेत. वृत्तसंस्थेनुसार, रशियन सैन्याने रविवारी युक्रेनमधील दक्षिण-पूर्वेकडील झापोरिझ्झ्या शहरावर क्षेपणास्त्र हल्ला केला. अपार्टमेंट ब्लॉक्स आणि निवासी भागात हा हल्ला करण्यात आला.

झापोरिझ्झ्यावर रविवारी झालेला हल्ला हा गेल्या तीन दिवसांतील दुसरा (Russia VS Ukraine) हल्ला आहे. एजन्सीच्या म्हणण्यानुसार, रशियन विमानाने किमान 12 क्षेपणास्त्रे डागली. यादरम्यान 9 मजली अपार्टमेंटना लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्यात हायराईज अपार्टमेंट उद्ध्वस्त झाले. यासोबतच 5 निवासी इमारतींनाही लक्ष्य करण्यात आले.

Latur Earthquakes : लातूरमध्ये काल रात्री दोनदा भूकंपाचे धक्के; गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.