Chakan Crime : सावरदरी भागात छेडछाड आणि संशयातून दोन तरुणांचा खून

एमपीसी न्यूज : चाकण (Chakan Crime) एमआयडीसीमधील सावरदरी (ता.खेड) येथे छेडछाड व काही संशयातून दोन तरुणांचा धारदार चाकूने वार करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. सुरज नंदकुमार चव्हाण (वय 27) व अनिकेत किसन पवार (वय 24, दोघेही सध्या रा. सावरदरी) अशी या खून झालेल्या दोघांची नावे आहेत.

या प्रकरणी स्वप्नाली सूरज चव्हाण (वय 29, सध्या रा. सावरदरी, मूळ रा. जि. सातारा) यांनी महाळुंगे पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यावरून प्रदिप दिलीप भगत (सध्या रा. सावरदरी, मूळ रा. वाशीम) याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महाळुंगे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी 8 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सावरदरी गावातील भक्ती अपार्टमेंट जवळ यातील प्रमुख संशयित आरोप प्रदिप दिलीप भगत याने फिर्यादी यांच्या घराच्या शेजारी राहणाऱ्या एका महिलेची छेड काढून तिला वारंवार त्रास देत होता. तसेच, संबंधित महिलेच्या घराच्या स्नानगृहाच्या खिडकीची काच फोडल्याच्या संशयातून फिर्यादी महिलेचे पती सुरज चव्हाण (वय 27) व त्यांचा मित्र अनिकेत पवार (वय 24) दोघे आरोपीस जाब विचारण्यासाठी गेले. त्यावेळी त्यांच्यात जोरदार वाद झाला.

आरोपी प्रदिप भगत याने सुरज आणि अनिकेत या दोघांच्या पोटावर धारदार सुऱ्याने सपासप वार करून जखमी केले. या दोघांना स्थानिकांनी तत्काळ चाकण आणि तळेगाव येथील रुग्णालयात उपचारासाठी पाठवले. मात्र, उपचारापुर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. घटनेनंतर आरोपी पसार झाला. महाळुंगे पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून महाळुंगे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरु आहे. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भेट दिली.

माहिती मिळवण्याचे ‘दिव्य’ : Chakan Crime

चाकण औद्योगिक भागात अनेक ठिकाणी भाड्याच्या खोल्यांमध्ये अनेक असामाजिक प्रवृत्तींनी वास्तव्यासाठी आधार घेतल्याची बाब वेगवेगळ्या घटनांमधून समोर येत आहे.  औद्योगीकारणाने आलेल्या राज्य व परराज्यातील लोकसंखेच्या लोंढ्यांना उत्पन्नाचे साधन करून त्यांना भाडेकरू म्हणून ठेवून महिन्याकाठी हजारो – लाखो रुपये पदरात पाडून घेणार्‍या घरमालकांनी असामाजिक प्रवृत्तींनाही न कळत थारा दिल्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सावरदरी आणि मेदनकरवाडी भागात मागील दोन दिवसांत (Chakan Crime) दोन खुनाच्या घटना उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे संपूर्ण एमआयडीसी भागातील सर्व भाडेकरूंची माहिती मिळवण्याचे दिव्य पोलीस प्रशासनाच्या समोर आहे.

Chinchwad crime : अवैध सावकारी करणाऱ्यास चिंचवड पोलिसांकडून अटक

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.