Today’s Horoscope 10 October 2022 : जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग – Today’s Horoscope 10 October 2022
सोमवार.
तारीख 10.10.2022
शुभाशुभ विचार- उत्तम दिवस.
आज विशेष – साधारण दिवस.
राहू काळ – सकाळी 7.30 ते 9.00
दिशा शूल- पूर्वेस असेल.
आजचे नक्षत्र- रेवती 16.02 पर्यंत नंतर अश्विनी.
चंद्र राशी- मीन 16.02 पर्यंत नंतर मेष.
————————————–
मेष – शुभ रंग- राखाडी
आज मी पणा प्रगतीच्या आड येऊ शकतो. मृदू वाणीने बरीच अवघड कामे सोपी करता येतील. एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी तातडीचा प्रवास घडण्याची शक्यता आहे. दुपारनंतर हरवलेले गवसेल.

वृषभ – शुभ रंग – भगवा
आजचा दिवस तुमच्यासाठी सर्वच दृष्टीने अनुकूल आहे. आज केलेल्या कोणत्याही वाटाघाटी सकारात्मकतेने पार पडतील. जिवलग मित्राकडून अपेक्षित सहकार्य मिळू शकेल.

मिथुन – शुभ रंग – पिस्ता (Today’s Horoscope 10 October 2022)
यशस्वी लोकांच्या सहवासात आज तुमचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल. कामाच्या व्यापात आज घरगुती प्रश्न दुर्लक्षित होतील. अत्यंत व्यस्त दिवस. दिवसाचा उत्तरार्ध लाभाचा.

कर्क – शुभ रंग – गुलाबी
आज घरात वडीलधाऱ्या मंडळींशी काही वादविवाद होतील. तुम्हाला आज जरा एकांताची गरज भासेल. जेष्ठ मंडळींची पावले सत्संगाकडे वळतील. दिवसाचा उत्तरार्ध जास्त अनुकूल.

सिंह – शुभ रंग – चंदेरी
आपल्या कार्यक्षेत्रात स्पर्धकांना कमजोर समजू नका नोकरीच्या ठिकाणी आज नियमांची अंमलबजावणी काटेकोरपणे करा. अन्यथा हितशत्रू टपूनच बसलेत, सतर्क रहा.

कन्या – शुभ रंग – क्रीम
आज व्यवसायात तुमचे भागीदारांशी एकमत राहील. वैवाहिक जीवनात गोडी गुलाबी असून काही जुन्या स्मृती मनास आनंद देतील. संध्याकाळी मात्र जोडीदाराचे काहीतरी बिनसण्याची शक्यता आहे.

तूळ – शुभ रंग – मरून
नोकरीच्या ठिकाणी विरोधकांचा उपद्रव चालूच राहील. आरोग्यविषयक तक्रारींची आज वेळीच दखल घेणे आवश्यक. दुकानदारांची थकलेली येणी वसूल होण्याची शक्यता आहे.

वृश्चिक – शुभ रंग – क्रीम
नोकरदारांना नोकरीत बदल करायचा असेल तर योग्य संधी चालून येतील. नवोदित कलाकारांच्या प्रयत्नांना यश येईल रुग्णांना हॉस्पिटल मधून डिस्चार्ज मिळेल.

धनु – शुभ रंग – केशरी
प्रॉपर्टीच्या खरेदी विक्रीचे व्यवहार मार्गी लागतील. विद्यार्थ्यांना किचकट विषयातही गोडी निर्माण होईल. गृहिणींना मात्र आज अजिबात उसंत मिळणार नाही.

मकर – शुभ रंग – निळा
आजचा दिवस खूपच धावपळीचा आहे. तुमचा आत्मविश्वास वाढवणारी एखादी घटना घडेल. उच्च अधिकारी असाल तर सह्या करण्यापूर्वी कागदपत्रे नीट तपासून घ्या.

कुंभ – शुभ रंग – आकाशी
आज मिळकत उत्तम असेल. गृहिणींना अचानक येणाऱ्या पाहुण्यांची उठबस करावी लागेल. आज प्रवास त्रासदायक होऊ शकतात. फार अर्जंट नसतील तर टाळलेले बरे.

मीन – शुभ रंग – लाल
कमी श्रमात जास्त लाभाच्या अपेक्षेने निराशाच पदरात पडेल. महत्त्वाचे निर्णय विचार करून घ्या. अडचणीच्या प्रसंगी आज जोडीदाराने दिलेले सल्ले उपयुक्त असतील. आज शुभ चिंता शुभ बोला.

शुभम भवतु

श्री जयंत बाळकृष्ण कुलकर्णी
( ज्योतिष व वास्तु सल्लागार)
फोन 9689165424

Chinchwad crime : अवैध सावकारी करणाऱ्यास चिंचवड पोलिसांकडून अटक

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.