Chinchwad crime : अवैध सावकारी करणाऱ्यास चिंचवड पोलिसांकडून अटक

एमपीसी न्यूज : 6 लाख रुपये कर्ज देऊन 27.60 लाखांची वसूली करून, तीन फ्लॅट नावावर करून घेतले तसेच आणखी 20 लाख रुपये मागणी केली. (Chinchwad crime) याप्रकरणी अवैध सावकारी करणाऱ्यास अटक करण्यात आले आहे.  दीपक सुर्यवंशी, रा. शिवनगरी बिजलीनगर चिंचवड या आरोपीस अटक करण्यात आले आहे.

त्याच्या विरोधात चिंचवड पोलीस ठाण्यात भा.द.वि. कलम 386, 504, 506 सह महाराष्ट्र सावकारी कायदा 2014 चे कलम 39, 45 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष सहकारी कक्ष करीत आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या आदेशान्वये सावकारी कक्ष स्थापन करून त्या संदर्भातील गुन्ह्यांचा व अर्जाचा तपासाबाबत आदेशित केले आहे. पोलीस आयुक्त यांना भेटून फिर्यादीने तक्रारी अर्ज केला असता सदर अर्जाची चौकशी सावकार कक्ष करीत असताना चौकशी अंती समजले की फिर्यादी यांचा बांधकाम व्यवसाय असून बांधकाम व्यवसाय साठी पैशांची गरज असल्याने त्यांनी आरोपी दीपक सूर्यवंशी यांच्याकडून कर्ज घेतले होते.

फिर्यादीने सन 2015 मध्ये बांधकाम व्यवसायासाठी द.मा.द.शे 10% व्याजाने 6 लाख रुपये घेतले होते. ते ठरल्याप्रमाणे फिर्यादी आणि व्याजाचे पैसे परत न केल्याने आरोपीने पिराजी यांना वारंवार फोन करून व्याजाचे पैसे न देण्याचे कारणावरून जीवे मारण्याची धमकी दिली होती.

आरोपींनी व्यास व चक्रवाढ व्याज असे एकूण 27.60 लाख रुपये वसूल करून तसेच फिर्यादी यांचे व त्यांचे वडिलांची नावे असलेले तीन फ्लॅट आरोपी आणि कागदपत्रे तयार करून बळजबरीने त्याच्या नावावर करून घेतले. तसेच पुन्हा 20 लाख रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.(Chinchwad crime) त्यामुळे आरोपी सूर्यवंशी याला पोलिसांनी 8 ऑक्टोबरला अटक केले आहे.

Eid-e-milad : हजरत महंमद पैगंबर साहेब जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा

 

या आरोपी विरुद्ध यापूर्वी चिंचवड पोलीस स्टेशन मध्ये तीन गुन्हे दाखल असून तो सराईत गुन्हेगार आहे. आरोपी दीपक सूर्यवंशी व इतरही सावकारांनी सावकारी अवैध धंदा करून कर्जदारास वेठीस धरून व्याज, चक्रवाढ व्याज वसूल करत असतील तसेच सावकाराने अवैधरित्या कर्जदाराची मालमत्ता हडप करणे, कर्जावर अवास्तव  दराने व्याज आकारणे, बळाचा वापर करणे इतरही त्रास देणे सावकारी लायसन्स व्यतिरिक्त अन्य रीतीने सावकारीचा धंदा करत असेल तसेच बेकायदेशीर सावकाराचे व्यवहार करणाऱ्यांवर तक्रार देण्याचे आवाहन पोलिसांनी केलेले आहे.

पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पोलीस उप आयुक्त( गुन्हे) डॉ. काकासाहेब डोळे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे-1 पद्माकर घनवट,(Chinchwad crime)  सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षातील पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक प्रदीपसिंग  सिसोदे पोलीस उपनिरीक्षक (श्रेणी) विजय कांबळे, पोलीस अंमलदार कल्याण महानोर, सुनील शिरसाट, सुधा टोके, भगवंता मुठे मारुती करचुंडे, गणेश कारोटे, वैष्णवी गावडे यांनी केलेली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.