Eid-e-milad : हजरत महंमद पैगंबर साहेब जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज : हजरत महंमद पैगंबर साहेब यांचा 1445 वा जयंती उत्सव यावर्षी मोठ्या उत्साहात पिंपरी-चिंचवड शहरात साजरा करण्यात आला. (Eid-e-milad) या निमित्ताने शहरातून भव्य जुलूस (मिरुवणूक) काढण्यात आली. या मध्ये  पिंपरी-चिंचवड शहरातील विविध पाच विभागातून मिरवणुका काढण्यात आल्या. यामध्ये दापोडी, कासारवाडी, फुगेवाडी विभाग; काळा खडक, वाकड, काळेवाडी, पिंपरी कॅम्प विभाग; निगडी आकुर्डी चिंचवड विभाग; कुदळवाडी, जाधववाडी, घरकुल विभाग; भोसरी दिघी, बालाजी नगर, नेहरूनगर विभाग या परिसरातील नागरिकांसह शहरातील 70 ते 80  मुस्लिम युवक मंडळाचे पदाधिकारी, सभासद सहभागी झाले होते.

 

मुख्य कार्यक्रम पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील मैदानात करण्यात आला . हजारोच्या संख्येने नागरिक मिरवणुकीत सहभागी झाले.( Eid-e-milad) या कार्यक्रमासाठी शहरातील विविध भागातून हजारो नागरिक आले होते. त्यांच्यासाठी बैठक व्यवस्था करण्यात आली. महिलांसाठी वेगळी बैठक व्यवस्था करण्यात आली होती. अहिल्याबाई होळकर चौक, मोरवाडी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पिंपरी येथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आहे. या दोन्ही चौका दरम्यानची पुणे – मुंबई महामार्गावरील वाहतूक ग्रेड सेपरेटर मधून वळविण्यात आली आहे.

Nigdi lecture : मंदिरांच्या देशा कलास्पर्श व्याख्यानमालेचे पहिले पुष्प निगडी येथे संपन्न 

 

शहरातील सुमारे 80 संस्थांच्या अध्यक्षांचा सत्कार पिंपरी-चिंचवड शहर जुलूस कमिटीच्या द्वारे केला जात आहे. गुलाम रसूल सय्यद, माजी अध्यक्ष, पिंपरी चिंचवड शहर जुलूस कमिटी म्हणाले की गेली दोन वर्ष पूर्ण महामारीमुळे हजरत महंमद पैगंबर साहेब यांच्या जयंती दिवशी जुलूस काढण्यात आला नव्हता. (Eid-e-milad) यावर्षी कोणतेही निर्बंध नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात जुलूस काढण्यात आला.अद्याप हा कार्यक्रम सुरू असून शहरातील सुमारे 80 संस्थांच्या अध्यक्षांचा सत्कार पिंपरी-चिंचवड शहर जुलूस कमिटीच्या द्वारे करण्यात येणार आहे . त्यानंतर अहमदाबादचे ज्येष्ठ मौलाना अहमद नक्शबंदी आणि पिंपरी-चिंचवड मधील मौलाना मार्गदर्शन करणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.