Chinchwad : वंदे भारत रेल्वे दरात मासिक पास सुविधा सुरु करा

पिंपरी-चिंचवड रेल्वे प्रवासी संघाची मागणी

एमपीसी न्यूज – वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेला मासिक पास सुविधा सुरु करण्याची मागणी पिंपरी-चिंचवड (Chinchwad) रेल्वे प्रवासी संघाकडून करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन संघाच्या वतीने मध्य रेल्वेच्या महा व्यवस्थापकांना देण्यात आले आहे.

Chinchwad : पिंपरी-चिंचवड मधील अवैध वृक्षतोडीबाबत दिल्लीत एक दिवसीय लाक्षणिक उपोषण

संघाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मध्य रेल्वेच्या पुणे-मुंबई मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस सह देशातील अन्य वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे गाड्यांना प्रवाशांचा कमी प्रतिसाद लाभत आहे. सुमारे 40 टक्क्यांहून अधिक सीट रिकाम्या राहत असल्याचे निदर्शनास येते. या महत्वाकांक्षी एक्सप्रेसचा प्रवास आरामदायक व सुविधायुक्त असला तरी तिचे तिकिट दर अन्य एक्सप्रेस व सुपरफास्टच्या तुलनेत खूपच जास्त आहेत.

त्याचबरोबर वंदे भारत एक्सप्रेसचा वेग देखील अन्य रेल्वे इतकाच असल्याने वेळेत देखील फारशी बचत होत नाही. या कारणांमुळे आता प्रवाशांनी वंदे भारत एक्सप्रेसकडे पाठ फिरवल्याचे दिसून येते. परिणामी, वंदे भारत एक्सप्रेस तोट्यात जाण्याची चिंता रेल्वे प्रशासनाला सतावत आहे. रेल्वे प्रशासन देशातील सर्वच वंदे भारत एक्सप्रेसचे तिकिट दर कमी करण्याचा विचार करीत आहे.

पुणे-मुंबई दरम्यान वंदे भारत एक्सप्रेसला योग्य दरात मासिक पास सुविधा सुरु केल्यास प्रवाशांची संख्या वाढेल. तसेच पुणे-मुंबई दरम्यान दररोज प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल. त्यामुळे मासिक पास सुविधा सुरु करण्यात यावी, असेही निवेदनात म्हटले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.