Chinchwad : पिंपरी-चिंचवड मधील अवैध वृक्षतोडीबाबत दिल्लीत एक दिवसीय लाक्षणिक उपोषण

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड (Chinchwad) शहरात झालेल्या अवैध वृक्षतोडीबद्दल केंद्र शासनाला जाग आणण्यासाठी वृक्षमित्र प्रशांत राउळ दिल्ली येथे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करणार आहेत. मंगळवारी (दि. 15) हे उपोषण दिल्ली येथील जंतरमंतर मैदानात हे उपोषण केले जाणार असल्याचे प्रशांत राउळ यांनी सांगितले.

Pimpri : यूजर आयडी पासवर्ड हॅक करून आयकर तपशील बदलला

पिंपरी-चिंचवड शहरात अनेक वर्षांपासून अवैध वृक्षतोड केली जात आहे. स्थानिक प्रशासकीय अधिकारी देखील यामध्ये सहभागी असल्याचा आरोप राउळ यांनी केला आहे. वृक्षतोड प्रकरणात आजवर काही कर्मचारी निलंबित केले आहेत. मात्र ही वृक्षतोड थांबवली गेली नाही.

याबाबत राउळ यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार पाठपुरावा केला आहे. राज्याचे पर्यावरण विभाग, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्रालय, भ्रष्टाचार विरोधी विभाग, लोकायुक्त यांच्याकडे देखील पाठपुरावा केला आहे. वृक्षतोड करणाऱ्या आरोपींना रंगेहाथ पकडून देऊन देखील पोलिसांनी काहीही कारवाई केली नाही. 5 जून रोजी राउळ यांनी मुंबई येथील आझाद मैदानावर एक दिवसाचे उपोषण केले, त्यावेळीही राज्य शासनाने त्यांची दखल घेतली नाही.

त्यामुळे आता स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी जंतरमंतर मैदानात एक दिवस लाक्षणिक उपोषण करून झाडांच्या स्वातंत्र्यासाठी लढा देणार असल्याचे राउळ म्हणाले. केंद्र शासन याप्रकरणी योग्य ती कारवाई करेल, असा विश्वास राउळ यांनी व्यक्त केला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.