Pimpri : यूजर आयडी पासवर्ड हॅक करून आयकर तपशील बदलला

एमपीसी न्यूज – आयकर विभागाच्या संकेतस्थळावरील लॉगिनसाठी लागणारा युजर आयडी आणि पासवर्ड हॅक करून आयकर तपशील बदलला. याप्रकरणी अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 26 ऑगस्ट 2019 रोजी भाटनगर पिंपरी येथे घडली.

Chakan : भरधाव ट्रकच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

राजेश श्यामलाल कोरी (वय 39, रा. भाटनगर, पिंपरी) यांनी याप्रकरणी चार वर्षानंतर 12 ऑगस्ट 2023 रोजी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 8948447218 या मोबाईल क्रमांक धारक आणि [email protected] या मेल धारकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात व्यक्तीने आयकर विभागाच्या संकेतस्थळावर लॉगिन करण्यासाठी लागणारा युजर आयडी आणि पासवर्ड हॅक केला. त्यानंतर फिर्यादी यांचा मोबाईल नंबर काढून त्याऐवजी स्वतःचा मोबाईल नंबर अपडेट केला.

तसेच प्रायमरी ईमेल आयडी वरील फिर्यादी यांचा ईमेल आयडी काढून त्या ऐवजी आरोपीने त्याचा ईमेल आयडी अपडेट केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.