Pune News : लवळे येथे विहिरीत बुडून एकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज : आज मंगळवार 6 डिसेंबरला विहिरीत बुडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना लवळे गावात घडली आहे.गणेश दतात्रय म्होकर असे या इसमाचे नाव आहे.

आज 6 डिसेंबर 2022 रोजी गणेश दतात्रय म्होकर वय अंदाजे 43 राहणार लवळे सिंबोसिस हॉस्पिटल जवळ हे म्हशी घेऊन रानात चरायला गेले असता त्याच्या म्हशी शेजारच्या शेतात जाऊ लागल्याने स्थानिक शेतकर्याने गणेश यांच्या घरच्यांना फोन करून सांगितले. त्यानंतर घरच्यांनी म्हशी घरी नेऊन बांधल्या आणि त्याचा शोध घेऊ लागले. त्या वेळी एका विहीरीच्या कडेला त्याचे कपडे, बुट व काठी दिसून आली.

Bhosari News : प्रेक्षक गॅलरीची कामे, मैदान विकसित करणार; 7 कोटींचा खर्च

त्या नंतर गणेश म्होकर यांच्या घरच्यांनी पौड पोलीस स्टेशनमध्ये संपर्क साधला असता मुळशी आपत्ती व्यवस्थापन समिती अध्यक्ष तथा मुळशी तालुका तहसीलदार अभय चव्हाण सो आणि पोलीस निरीक्षक मनोज कुमार यादव यांच्या मार्गदर्शना खाली मुळशी आपत्ती व्यवस्थापन व्यवस्थापण समिती व्यवस्थापक अध्यक्ष प्रमोद बलकवडे, हवलदार नितीन रावते, प्रशांत शिंदे, धणराज माणकर,राजू प्रधान घटनास्थळी दाखल झाले. 35 मिनिटात गणेशचा मृतदेह विहीरितून काढून ग्रामीण रुग्णालय पौड येथे पाठवण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.