Lifeguard training: मोफत जीवन रक्षक प्रशिक्षण शिबिराचा नागरिकांनी लाभ घ्यावा : डॉ. एन. जे. कर्णे 

एमपीसी न्यूज: भारतीय अस्थिरोग संघटना 2012 पासून 4 ऑगस्ट हा दिवस देशभर “अस्थी व सांधे आरोग्य दिन” म्हणून साजरा करीत आहे. या निमित्त देशभरातील संघटनेच्या शाखा बरोबरच महाराष्ट्र अस्थिरोग संघटना व पुणे अस्थिरोग सोसायटी देखील विविध सामाजिक उपक्रम राबवित असते. (Lifeguard Training) यावर्षी या दिनानिमित्त 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट या कालावधीत “प्रत्येकाने एक जीव वाचवावा” या संकल्पनेतून भारतातील रस्ते अपघातातील मृतांची संख्या कमी व्हावी या उद्देशाने महाराष्ट्रात सर्व अस्थिरोग रुग्णालयात आणि निवडक शाळा, महाविद्यालय तसेच पोलीस ठाण्यात “जीवन रक्षक प्रशिक्षण” अभियान राबविणार आहे.

 

या अभियानातून राज्यात एक लाखांपेक्षा जास्त आणि पुणे जिल्हात सात हजार जीवन रक्षक प्रशिक्षक तयार करण्याचे नियोजन केले आहे. (Lifeguard Training) या मोफत प्रशिक्षण शिबिराचा जास्तीतजास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र अस्थिरोग संघटनेचे सचिव डॉ. एन. जे. कर्णे यांनी पत्रकार परिषदेत केले. सोमवारी (दि. 1 ऑगस्ट) पुणे श्रमिक पत्रकार भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत डॉ. कर्णे बोलत होते. यावेळी पुणे अस्थिरोग सोसायटीचे अध्यक्ष डॉ. चेतन प्रधान, पुणे अस्थिरोग सोसायटीचे सचिव डॉ. स्वप्निल भिसे, डॉ. योगेश खंडाळकर, डॉ. सचिन जाधव आदी उपस्थित होते.

 

 

 

यावेळी डॉ. कर्णे यांनी सांगितले की, 2018 च्या जागतिक आकडेवारी नुसार 199 देशांपैकी भारतातील रस्ते अपघातातील मृतांची संख्या सर्वात जास्त आहे. भारतानंतर चीन आणि अमेरिकेचा नंबर आहे. हे रोखण्यासाठी समाजातील सर्व घटकांमध्ये जनजागृती होणे आवश्यक आहे. त्या अंतर्गत पुणे अस्थिरोग सोसायटी व महाराष्ट्र अस्थिरोग संघटनेच्या वतीने “प्रत्येकाने रस्ते अपघातातील एक जीव वाचवावा” ( Each One Save One) या संकल्पनेतून “जीवन रक्षक व प्रथमोपचार प्रशिक्षण” पुण्यासह महाराष्ट्रातील विविध समाज घटकांमध्ये राबवून जनजागृती करण्यात येणार आहे. यामध्ये पुणे, पिंपरी चिंचवड शहर आणि पुणे जिल्हा परिसरातील शाळा, महाविद्यालयात तसेच निवडक पोलिस ठाण्यात, तसेच सर्व अस्थिरोग रुग्णालयात हे अभियान राबविण्यात येणार आहे अशीही माहिती डॉ. कर्णे यांनी यावेळी दिली.

 

https://youtu.be/DbEtPSr5mvc

 

डॉ. स्वप्नील भिसे यांनी सांगितले की, 2019 – 20 च्या भारतातील रस्ते अपघातातील आकडेवारी नुसार संपूर्ण भारतात 4,49,002 एवढ्या अपघातांची नोंद झाली आहे. यामध्ये 1,51,113 नागरिकांना आपला जीव गमवावा लागला तर 4,51,361 नागरिक गंभीर जखमी झाले. (Lifeguard Training) यामध्ये 18 ते 45 वर्षे वयातील तरुणांचे अपघातग्रस्त होण्याचे प्रमाण 69.3 टक्के आहे. तर 18 ते 60 या वयोगटातील मृत्यूचे प्रमाण हे 84.3 टक्के आहे. या रस्ते अपघातातील मृतांच्या एकूण संखेमध्ये 86 टक्के पुरुष आहेत. तसेच कुटुंबातील ते एकमेव कमावते व्यक्ती आहेत. अशा कुटुंबांना आर्थिक, कौटुंबिक आणि सामाजिक अशा अनेक संकटांचा सामना करावा लागतो. यासाठी रस्ते अपघात रोखणे तसेच अपघातग्रस्त व्यक्तीस पहिल्या एक तासात ( गोल्डन आवर) प्रथमोपचार व तातडीची वैद्यकीय मदत होईल अशी व्यवस्था असणे गरजेचे आहे.

 

Annabhau Sathe Jayanti: ऑर्डनस फॅक्ट्री येथे अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

 

 

परंतु दुर्दैवाने अनेक अपघातात गोल्डन आवर मध्ये जीवन रक्षक प्रथमोपचार व तातडीची वैद्यकीय मदत मिळत नाही. यासाठी समाजातील सर्व घटकांमध्ये जनजागृती होणे आवश्यक आहे.(Lifeguard Training) त्यासाठीच पुणे अस्थिरोग सोसायटी आणि महाराष्ट्र अस्थिरोग संघटनेचे सर्व सदस्य विविध ठिकाणी प्रशिक्षण देणार आहेत अशी माहिती डॉ. भिसे यांनी दिली. डॉ. चेतन प्रधान यांनी सांगितले की, 1 ते 7 ऑगस्ट या कालावधीत पुणे आणि पिंपरी ( मोशी प्राधिकरण) आरटीओ, पुणे व पिंपरी चिंचवडसह पुणे जिल्ह्यातील निवडक प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात, काही पोलिस ठाण्यात तसेच सर्व अस्थिरोग रुग्णालयात हे अभियान राबविण्यात येणार आहे. यामध्ये 60 ठिकाणी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच यातून 6000 पेक्षा जास्त “जीवन रक्षक प्रशिक्षक” तयार करण्याचा संकल्प आहे.

https://youtu.be/8YCA-2qIssI

या अभियानाचे उत्कृष्ठ पीपीटी तयार करण्यात आले आहे. काही ठिकाणी झूम मीटिंग द्वारे ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच निवडक संस्थांना पेन ड्राईव्हद्वारे पीपीटी देण्यात येईल. या अभियानाची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये करण्याचा मानस आहे. अशी माहिती डॉ. प्रधान यांनी दिली.
   हिंदी मध्ये या युट्यूब चॅनेलवर उबलब्ध करून देण्यात येणार आहे. ज्या शाळा, महाविद्यालय, सामाजिक संस्थांना हे प्रशिक्षण घ्यायचे असेल त्यांनी कार्यालयात समन्वयक हाफीज मुल्ला यांच्याशी (फोन नंबर ७६६६३९३५३८)संपर्क साधावा असेही आवाहन डॉ. भिसे यांनी केले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.