Electric Crematorium Yerwada : येरवाडा येथील विद्युत दाहिनी दहा दिवस राहणार बंद

एमपीसी न्यूज – येरवडा येथील विद्युत दाहिनी (Electric Crematorium Yerwada) क्रमांक दोन हे देखभाल दुरुस्तीसाठी पुढील दहा दिवस बंद राहणार आहे, अशी माहिती पुणे महापालिकेच्या वतीने पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

Lifeguard training: मोफत जीवन रक्षक प्रशिक्षण शिबिराचा नागरिकांनी लाभ घ्यावा : डॉ. एन. जे. कर्णे 

पत्रकात दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार 2 ऑगस्ट ते 12 ऑगस्ट या दहा दिवसांच्या कालावधीत विद्युत दाहिनी ही बंद राहणार आहे. कारण दाहिनीमधील खराब झालेल्या विटा व कॉईल यांच्याशी निगडीत दुरुस्तीची कामे यावेळी करण्यात येणार आहेत. तरी नागरिकांच्या सोईसाठी येरवाडा येथील विद्युत दाहिनी क्रमांक एक व एपीसी सिस्टीमची सुविधा उपलब्ध राहणार आहे, अशी माहिती पुणे महापालिकेचे विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता योगेश माळी यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.