Pimpri MIM: पिंपरीत एमआयएच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

 एमपीसी न्यूज : लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त एम आय एम पक्षाच्यावतीने पिंपरी येथे(Pimpri MIM) सोमवारी (दि.1) अभिवादन करण्यात आले.

 

यावेळी शहराध्यक्ष धम्मराज साळवे ,महिला शहराध्यक्ष रुहीनाज शेख ,पुणे जिल्हाध्यक्ष फैयाज शेख ,सचिव कुतुबुद्दीन होबळे यांनी लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

 

Jansanvad Sabha : मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा; नागरिकांची जनसंवाद सभेत मागणी

 

  यावेळी बोलताना अण्णाभाऊ साठे कविता आणि अण्णाभाऊ साठे शायरी, पोवाडे आजही अभिमानाने गायले जातात त्यांची ‘माझी मैना’ हे मुंबईबद्दल लिहिलेलं गीत आजही अजरामर आहे.(Pimpri MIM)आपला संयुक्त महाराष्ट्र बलशाली होण्याकरिता प्रत्येक नागरिकाने सज्ज असावे असे मत शहराध्यक्ष धम्मराज साळवे यांनी व्यक्त केले .

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.