Annabhau Sathe Jayanti: ऑर्डनस फॅक्ट्री येथे अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

एमपीसी न्यूज : देहुरोड येथील ऑर्डनस फॅक्टरी येथे आज (दि.1) अण्णाभाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली.(Annabhau Sathe Jayanti) ही जयंती भारतीय मजदूर संघ, सामाजिक समरसता मंच, ” अण्णाभाऊ साठे विचार मंच यांच्या वतीने संयुक्तरित्या साजरी करण्यात आली. 

 

यावेळी अण्णाभाऊ साठे महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे, अरुण पाटोळे, संघटनेचे अध्यक्ष  राकेश भोंडे, कार्यअध्यक्ष राजकुमार, सरचिटणीस निखिल तापकीर, सहसेक्रेटरी निलेश गायकवाड, गोपाळ कारंजकर, रमेश रमेश सोमनाथ वालकोळी, कारखान्यामधील अण्णाभाऊ साठे विचार मंचाचे अध्यक्ष शिवाजी खंडाळे,.महेश शेंडगे, विजय उमाप, नंदु नाईक, आणि कारखान्यामधील सर्व संघटनेचे पदाधिकारी ,कार्यसमिती सदस्य आणि कामगार उपस्थित होते.

 

Pune cartridges seized: पुण्यात पोलिसांच्या कारवाईमध्ये 8 पिस्टल व 24 जिवंत काडतुसे जप्त

 

यावेळी बोलताना गोरखे म्हणाले की,येथील कामगार हे शस्त्रसाठा तयार करतात जो की देशातील सैन्य संरक्षणासाठी वापरतात, ही खूप अभिमानाची गोष्ट आहे.(Annabhau Sathe Jayanti) अण्णाभाऊंचे सर्व भाषेत असलेले साहित्य तसेच त्यांचे विचार सर्वानी आत्मसात केले पाहिजे, त्यांची पुस्तके वाचली पाहिजेत भारताच्या नाही तर रशियापर्यंत अण्णाभाऊचे विचार हे पोहचले आहेत. अण्णाभाऊ मुळे कामगार संघटना त्यावेळी एकवटली व तिला चेतना मिळाली. येणाऱ्या काळात अण्णाभाऊ साठे आर्थिक महामंडळाच्या वतीने सर्व समाजासाठी, विविध योजनांसाठी मी प्रयत्नशील राहीन कोणत्याही प्रकारची मदतीसाठी मी सैदव आपल्या सोबत आहे असे आश्वासन दिले.” यावेळी राकेश सोनावणे यांनी सुत्रसंचालन केले तर अशोक थोरात यांनी परीचय दिला कार्यसमिती सदस्य रुपेश रनधिर यांनी आभार व्यक्त केले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.